नागपूर : आपत्तीजनक संदेश पाठवणाऱ्या एका वाहतूक पोलीस हवालदाराला त्याची सहकारी महिला व तिच्या पतीने कार्यालयातच मारहाण केली. ही घटना इंदोरा परिसरात असलेल्या पोलीस कार्यालयात घडली. सहाय्यक पोलीस आयुक्त व  पोलीस निरीक्षकाने मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदोरा भागातील कार्यालयात पोलीस हवालदार नंदू कार्यरत आहे. तो वसुली आणि डय़ुटी लावण्याचे काम करतो. तो अधिकाऱ्यांचा आर्थिक व्यवहार सांभाळतो. त्याची पोलीस दलात कार्यरत एका महिला पोलिसावर वाईट नजर होती.  नंदू तिला मानसिकरित्या त्रास देत होता. विनाकारण त्रास होईल अशा ठिकाणी डय़ुटी लावत होता, आपत्तीजनक मोबाईल संदेश पाठवत होता. नंदूचा त्रास वाढत असल्याने तिने पोलीस दलात असलेल्या पतीला सांगितले.  दोघांनीही नंदूला समजावून सांगितले. मात्र, तो बधत नव्हता. अखेर महिला पोलीस कर्मचाऱ्याने आणि तिच्या पतीने नंदूला बदडले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic police beaten by woman cop in nagpur zws
First published on: 07-01-2020 at 04:49 IST