Premium

गडचिरोली : गुंडापुरीतील तिहेरी हत्याकांड जादुटोण्यातून? चार संशयित ताब्यात

भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृध्द आजी- आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना ७ डिसेंबरला उघडकीस आली होती.

Triple murder in Gundapuri by black magic Four suspects arrested
या हत्याकांडाला जादूटोण्याची किनार असल्याचा संशय गावकऱ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरीत वृध्द आजी- आजोबांसह नातीची गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना ७ डिसेंबरला उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी गावातून चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याला जादूटोण्याची किनार असल्याचा संशय गावकऱ्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

अर्चना रमशे तलांडी (१०,रा.येरकल ता.एटापल्ली), देवू दसरु कुमोटी (६०), बिच्चे देवू कुमोटी (५५,रा. गुंडापुरी ता. भामरागड) अशी मृतांची नावे आहेत. देवू कुमोटी यांची मरकल (ता.एटापल्ली) येथील नात अर्चना ही आजी- आजोंबाकडे दिवाळी सुटीत आली होती. अर्चना तलांडेसह देवू व बिच्चे कुमोटी या तिघांचा गळा चिरलेला मृतदेह ७ डिसेंबरला शेतातील घरात आढळून आला. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविले. त्यानंतर गुंडापुरीत अंत्यसंस्कार झाले. एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने गुंडापुरी व परिसर हादरुन गेला आहे. एटापल्लीच्या बुर्गी (कांदोळी) ठाण्यात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी गावातून चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे विचारपूस सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-चंद्रपूर : नागरिकांना हादरवून सोडणारा बिबट अखेर जेरबंद

गावकऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा

सुरुवातीला हत्याकांडामागे नक्षवाद्यांचा हात असल्याची अफवा पसरली होती. परंतु, पोलिसांनी ती फेटाळून लावली. संपत्तीच्या वादातून हत्यांकाड घडले असावे, असा अंदाज होता. परंतु, देवू कुमोटी हे जादूटोणा करत असत, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे या बाजूनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र, अद्याप पोलिसांच्या हाती ठोस कारण लागलेले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Triple murder in gundapuri by black magic four suspects arrested ssp 89 mrj

First published on: 08-12-2023 at 19:57 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा