scorecardresearch

शहरातच दोन हजार रुग्ण, चौघांचा मृत्यू!

जिल्ह्यात २४ तासांत ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर नवीन २ हजार ४५१ रुग्णांचे निदान झाले.

Coronavirus-1

जिल्ह्यात सकारात्मक अहवालाचे प्रमाण २८.२० टक्के

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर नवीन २ हजार ४५१ रुग्णांचे निदान झाले. विशेष म्हणजे, आता शहरातच दोन हजार रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात चाचण्यांच्या तुलनेत सकारात्मक अहवालाचे प्रमाण वाढून २८.२० टक्के नोंदवले गेले असतांनाच मृत्यू संख्याही वाढत आहे. नागपूर शहरात दिवसभरात ७ हजार ६९६, ग्रामीणला ९९४ अशा एकूण ८ हजार ६९० चाचण्या करण्यात आल्या. त्यात शहरात १ हजार ९६१, ग्रामीणला ४०८, जिल्ह्याबाहेरील ८२ अशा एकूण २ हजार ४५१ रुग्णांना करोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात सकारात्मक अहवालाचे प्रमाण २४.९० टक्के, ग्रामीणला ४१ टक्के आणि संपूर्ण जिल्ह्यात २८.२० टक्के असल्याचे पुढे आले. जिल्ह्यात सकारात्मक अहवालाचे प्रमाण खूप जास्त वाढल्याने चिंता वाढली आहे. नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ५४ हजार ७१९, ग्रामीण १ लाख ४९ हजार १८३, जिल्ह्याबाहेरील ७ हजार ६२१ अशी एकूण ५ लाख ११ हजार ५२३ रुग्णांवर पोहचली आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ९५.५५ टक्के

शहरात दिवसभरात ७६०, ग्रामीणला ११७, जिल्ह्याबाहेरील ११२ असे एकूण ९८९ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांचे प्रमाण ३ लाख ३८ हजार ६०५, ग्रामीण १ लाख ४४ हजार २३०, जिल्ह्याबाहेरील ५ हजार ९१७ असे एकूण ४ लाख ८८ हजार ७५२ व्यक्तींवर पोहचले. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९५.५५ टक्के आहे.

विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी सात मृत्यू

विदर्भात रविवारी सात करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असतानाच सोमवारीही सात मृत्यू नोंदवण्यात आले. दगावलेल्या रुग्णांमध्ये नागपूर जिल्ह्यातील ४, गडचिरोलीतील २, गोंदियातील १ रुग्णाचा समावेश आहे. सोमवारी नागपुरात २,४५१, अमरावती २७६, चंद्रपूर १७९, गडचिरोली १५६, यवतमाळ ९३, भंडारा ४९, गोंदिया १०३, वाशिम ७३, अकोला १२३, बुलढाणा १६१, वर्धा जिल्ह्यात ४५ असे एकूण विदर्भात ३ हजार ७०९ नवीन रुग्ण आढळले.

सक्रिय रुग्णसंख्या साडेबारा हजारांवर

शहरात सोमवारी १० हजार १२०, ग्रामीणला २ हजार ३४९, जिल्ह्याबाहेरील ८६ असे एकूण १२ हजार ६६५ सक्रिय रुग्ण होते. १ जानेवारीला सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ३२२ रुग्ण इतकी होती.

तीन अधिकाऱ्यांसह ४६ पोलीस बाधित

पोलीस विभागात करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असून सोमवारी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ४६ पोलीस बाधित झाले. सर्व बाधित गृहविलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहर पोलीस दलातील आतापर्यंत २६२ पोलीस अधिकारी व कर्मचारी करोनाग्रस्त आढळले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two thousand patients city corona patients ysh

ताज्या बातम्या