नागपूर : वंचित बहुजन आघाडीने पूर्वी घोषित केलेले उमेदवार बदलण्याचा सपाटा लावल्याने त्यांच्यावर ही वेळ का आली याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. जेथे जेथे महायुतीला फायदा होऊ शकतो अशाच ठिकाणी हा उमेदवार बदल केल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक घोषणेपूर्वी महाविकास आघाडीसोबत चर्चा करणारे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नंतर स्वतंत्रपणे काही उमेदवारांची यादी घोषित केली होती. आता काही ठिकाणी बदल केले जात आहेत. विदर्भातील रामटेक लोकसभा मतदारसंघात वंचितने शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्जही भरला होता. बुधवारी त्यांनी या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा दिला. या निर्णयाचा फायदा शिंदे गटाच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा…दिल्लीनंतर नागपूरकडे धाव; सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम…

अमरावती मतदार संघात पूर्वी वंचितने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र त्यांनी अर्ज भरला नव्हता. २ एप्रिलला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा अपेक्षित होता. पण वंचितने तो न दिल्याने आंबेडकर यांनी बुधवारी रात्री पत्रक काढून निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. पण, गुरुवारी वंचितने आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही, आंबेडकर यांनी माघारीच्या निर्णयावर आपण कायम असल्याचे जाहीर केले. सध्या येथे वंचितचा उमेदवारच नाही.

हेही वाचा…खासदार सुनिल मेंढेना शेतकऱ्यांनी प्रचारापासून रोखले, आल्या पावलीच…

परभणीमध्ये वंचितने बाबासाहेब उगले यांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र आता त्यांच्याऐवजी पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे. डख हे हवामानाचा अंदाज व्यक्त करणारे म्हणून ओळखले जातात. ते मराठा आहेत. उद्धव ठाकरे गटाचा उमेदवारही मराठा आहे. परभणीतील मराठा केंद्रीत राजकारण बघता डख यांच्या उमेदवारीमुळे मराठा मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महायुतीच्या महादेव जानकर यांना होण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi changes lok sabha candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 election cwb 76 psg
Show comments