नागपूर : मित्रासोबत असलेल्या अनैतिक संबंधात पती आड येत असल्यामुळे पत्नीने मुलीच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, पारडी पोलिसांनी हत्याकांड उघडकीस आणले असून पत्नीला अटक केली. ही घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागेश्वरनगर येथे घडली. धमेंद्र गजभिये असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमेंद्रला पत्नी आणि तीन मुली आहेत. तो खासगी ट्रकचालकाचे काम करतो. पत्नी निशा गजभिये हिचे कुणा पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत, असा त्याला संशय होता. या कारणावरून त्यांच्यात नेहमीच खटके उडायचे. त्याचप्रमाणे मागील दोन महिन्यांपासून तो कामावरही जात नव्हता. त्याने आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. १० एप्रिलला रात्री ११ वाजताच्या सुमारास पती-पत्नीत यावरून वाद झाला. या भांडणात दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. धमेंद्र आणि निशा यांच्यात भांडण होत असताना तीन मुली दुसऱ्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. रात्री १ वाजेपर्यंत त्यांचे भांडण सुरू होते. यानंतर निशा आणि तिच्या १७ वर्षीय मोठ्या मुलीने धमेंद्रचा गळा आवळून खून केला. यानंतर निशाने भावाला फोन करून घरी बोलावले. निशाने दुसऱ्या दिवशी सकाळी पारडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पारडीचे ठाणेदार मनोहर कोटनाके, भरत शिंदे, उपनिरीक्षक रणदिवे घटनास्थळी गेले. त्यांना संशय आला.

Additional fare EFT is being allowed for passengers traveling in reserved coaches on ordinary tickets
आरक्षित डब्यांत रेल्वेच्या कृपेने ‘साधारण’ प्रवाशांचा सुळसुळाट
Voting in second phase lower than expected in Vidarbha lok sabha election 2024
मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान
Rains in Morshi and Dhamangaon assembly areas
वर्धा: अंतिम आकडेवारीवर अवकाळी पावसाचे सावट
Crime against former minister Anil Deshmukh wardha
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…

संशयावरून हत्याकांड उघडकीस

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पंख्याला लटकून धमेंद्रने आत्महत्या केली, असे निशाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पंख्याची पाहणी केली असता तो कुठेही वाकला नव्हता. त्याचप्रमाणे पंख्यावरील धूळ जशीच्या तशी होती. ज्या खुर्चीवर उभा राहून धमेंद्रने गळफास लावला त्या खुर्चीपासून पंख्यापर्यंत त्याचा हात पुरत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून निशाला ताब्यात घेतले. तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी निशाला अटक करीत तिच्या मुलीला ताब्यात घेतले. पारडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.