खर्चात बचतीसाठी पालकांचे पाऊल

नाशिक : टाळेबंदीत वेगवेगळ्या क्षेत्रांना अडचणींना तोंड द्यावे लागत असतांना या दृष्टचक्रोत लहान मुले मात्र वेगवेगळ्या पध्दतीने भरडली जात आहेत. टाळेबंदीच्या काळात शाळा, महाविद्यालय बंद असल्याने बालके  घरात अडकली. या काळात पालकांवर बेरोजगारीची टांगती तलवार असल्याने काही लहान मुलींची लग्ने झाली. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात जिल्ह्य़ाच्या विविध भागात होणारे २२ बालविवाह तक्रोरींमुळे उघड झाली. काही प्रकरणे अद्याप समोर आलेली नाहीत सुमारे एक वर्षांहून अधिक कालावधीपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत.

ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू असले तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात तांत्रिक संपर्क, भ्रमणध्वनी, उपयुक्त साधन सामग्री याची उपलब्धता नसल्याने शिक्षणात अडचणी येतात. त्यातच आर्थिकदृटय़ा दुर्बल असलेल्या पालकांनी घरातील अल्पवयीन मुलींची लग्ने लावणे सुरु के ले. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागातून बाल विवाह रोखण्यासाठी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आल्याचे चाईल्ड लाईनचे समन्वय अधिकारी प्रवीण आहेर यांनी सांगितले.

नाशिक शहर, नांदगाव, येवला, सिन्नर आदी भागातून बालविवाह रोखण्यासाठी संपर्क साधण्यात आला. यामध्ये २२ प्रकरणे तक्रोरींमुळे उघड झाली. तक्रोरच न आलेलीही काही प्रकरणे आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्याने कमी खर्चात लग्न उरकण्यासाठी पालकांनी बालविवाहाचा पर्याय स्विकारल्याचे आहेर यांनी नमूद के ले. शाळा,  महाविद्यालय बंद आहे. ऑनलाईन शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नाही. शिकू न पुढे काय करणार, असे सांगत मुलीला बोहल्यावर चढवले जात आहे.

काही ठिकाणी समाजाचा तर काही ठिकाणी नातेवाईकांचा दबाव येत आहे. घरातील एकाचा खाण्याचा खर्च कमी होईल, टाळेबंदी असल्याने कोणालाही फारसे काही कळणार नाही, अशा विचाराने बालविवाह होत आहेत. पाच प्रकरणात पालकांनी न ऐकल्याने त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाल लैंगिक शोषणाच्याही तक्रोरी

टाळेबंदीच्या काळात बाल लैंगिक शोषणाच्या तक्रोरीही आल्या. या काळात मुले घरात अडकल्याने काहीशी वैतागली आहेत. बालकांच्या अज्ञानतेचा फायदा घेत त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात येत आहेत. अशा चार तक्रोरी आल्या. चार वर्षांच्या चिमुकलीचा त्यात समावेश असून तिच्यावर जन्मदात्यानेच अत्याचार के ला. याशिवाय एका मुलीला घरातील जवळचा नातेवाईक शारीरिक त्रास देत होता. चाईल्ड लाईनला यासंदर्भात माहिती मिळाल्यावर संबंधित अधिकारी त्या घरी धडकले असता मुलीच्या पालकांकडून तिच्यावर दबाव आणला गेला. मुलीने चाईल्ड लाईन नेमके  काय काम करते, हे पाहत असल्याचे सांगितले. काही प्रकरणांमध्ये शारीरिक स्पर्श नेमका नकोसा, हे कसे स्पष्ट करायचे यावर मर्यादा येत असल्याने तक्रोर झाली तरी कारवाईला अडचणी येत आहेत.