News Flash

दुसऱ्या टप्प्यातील करोना लसीकरणास सुरुवात

करोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून  सोमवारी दुसऱ्या टप्प्यात शहरात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली.

करोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून  सोमवारी दुसऱ्या टप्प्यात शहरात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली.

तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी प्रतीक्षा कायम

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : करोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असून  सोमवारी दुसऱ्या टप्प्यात शहरात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणास सुरुवात झाली. तांत्रिक अडचणींमुळे काही ठिकाणी  नागरिकांना लसीकरण करण्यात न आल्याने परत फिरावे लागले. दोन ते तीन दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल, असा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

करोना प्रतिबंधासाठी लसीकरणाचा पर्याय खुला झाल्यावर करोना योद्धा असलेले वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले.  सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठांसह ४५ वर्षांपुढील सहव्याधी असलेल्यांना करोना लसीकरणास सुरूवात झाली. शहरात काही ठिकाणी या दुसऱ्या टप्प्यास सुरुवातच झाली नाही. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी लसीकरणाविषयी नियोजन झालेले नसल्याचे सांगितले. सरकारकडून अद्याप मार्गदर्शक सुचना अद्याप प्राप्त झालेल्या नाही. याबाबत अन्य यंत्रणांशी बोलून लवकरच कामाला सुरुवात होईल. हा पालिके कडे दोन्ही प्रकारच्या लसी उपलब्ध असून कोविन तसेच आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी करायची आहे. त्यानुसार संबंधितांना माहिती दिली जाईल, असे डॉ. नागरगोजे यांनी नमूद केले. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे लसीकरणविषयक प्रमुख अधिकारी डॉ. अनंत पवार यांनीही जिल्हा रुग्णालयात लसीकरणाचे नियोजन झालेले नसल्याचे सांगितले.  याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शासकीय रुग्णालय, तसेच महापालिका यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. याद्यांनुसार लसीकरण करण्यात येईल, असे डॉ. पवार यांनी नमूद के ले. लसीकरणविषयक जिल्हा प्रमुख अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी यांनी जिल्ह्य़ात  लसीकरणासाठी २० के ंद्रांवर व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या दिवशी प्रत्येक के ंद्रावर १० ते १५ लोकांनी लसीकरण के ल्याचे सांगितले. आरोग्य विभागाकडून नव्या अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येत आहे. रविवारी यासंदर्भात दृकश्राव्य माध्यमातून बैठका घेऊन प्रशिक्षणाला सुरुवात झाली. परंतु, याद्या अद्याप अद्यावत झालेल्या नाहीत. पहिल्या दिवशी प्रत्येक  के ंद्रावर नोंदणी के लेल्या ५० टक्के  लोकांना बोलावण्यात आले.  देवळाली येथे एका के ंद्रावर १०० लोक लसीकरणासाठी जमले. त्या ठिकाणी लसीकरण सुरू असून पुढील दोन ते तीन दिवसात लसीकरणास वेग येईल, असे त्यांनी नमूद केले.

लसीकरणातील अडचणी

करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना योद्धा म्हणून काम करणारे वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, अन्य तंत्रज्ञ, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्या त्या विभागाकडून संबंधित अ‍ॅपवर याद्या देण्यात आल्याने नोंदणी करण्याचे काम झाले. तसेच त्या याद्या अद्ययावतही झाल्या. करोना काळात भरती करण्यात आलेले कर्मचारी तीन महिन्याच्या कं त्राटावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांचा कालावधी संपल्याने अपुऱ्या मनुष्यबळावर हे काम सुरू आहे. याचा परिणाम दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणावर झाला. त्यांच्या याद्या तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्याविषयी नोंदणी कशी करायची माहिती नाही. लसीकरणाचा पहिलाच दिवस हा राष्ट्रीय जंतनाशक दिन होता. त्यामुळे निम्मी यंत्रणा जंतनाशक दिनानिमित्त गोळ्या देण्यात मग्न राहिली.

अर्ज कोण करू शकतो ?

लसीकरणासाठी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील इतर आजार असलेले लोक अर्ज करू शकतात. महात्मा फु ले योजनेअंतर्गत नोंदणीकृत खासगी रुग्णालयांमध्येही व्यवस्था आहे. यासाठी कोविन २.० अथवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करू शकतात. यासाठी ओळखपत्र, पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, पॅनकार्ड, एनपीआर स्मार्टकार्ड, पेन्शन कार्डवरून नोंदणी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 4:57 am

Web Title: coronavirus second phase vaccination started dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नोटीस देण्याचे प्रयोजन न समजण्यासारखे!
2 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेचा कार्यक्रम स्थगित
3 नाशिक जिल्ह्य़ात गिधाडांची संख्या वाढतेय!
Just Now!
X