नाशिक : करोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक कु टुंबामधील सदस्य रुग्णालयात उपचार घेत असल्याने होणारा खर्च फे डण्यासाठी घरातील सोने मोडणे किं वा तारण ठेवणे हेच पर्याय शिल्लक राहतात. त्यातच करोना साखळी खंडित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक र्निबधामुळे सोने मोडण्यासाठी दुकानांमध्ये जाणे जमण्यासारखे नसल्याने आर्थिकदृष्टया अडचणीत आलेल्या कु टुंबियांची सराफ व्यावसायिकांनी सोय के ली आहे. या पडत्या काळात रुग्णांच्या कु टुंबियांना तसेच इतरांना आर्थिक दृष्टया आधार देण्यासाठी येथील सराफ व्यावसायिकांनी सोने मोडण्याकरिता थेट घरपोच सुविधा देणे सुरू के ले आहे.

जिल्ह्य़ासह शहरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत आहे. रुग्ण आढळल्यानंतर तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर होत आहे. दिवसागणिक रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्राणवायूसज्ज खाट, रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे खाट मिळणे अवघड असल्याने काही लोकांकडून खासगी रुग्णालयांना प्राधान्य देण्यात येत आहे. परंतु, खासगी रुग्णालयात करोना रुग्णांवरील उपचाराचा खर्च काही लाखांच्या घरात जात आहे. अनेक घरात टाळेबंदीमुळे रोजगारावर गदा आली आहे. त्यामुळे रुग्णावरील उपचारात असलेली बचत रक्कम खर्च होत आहे. अधिकचा खर्च पेलण्यासाठी काय करावे, असा प्रश्न कु टुंबियांसमोर उभा आहे. अशावेळी काही जणांनी खासगी सावकारांकडून बँकापेक्षा चार ते पाच टक्के जादा दराने पैशांची जमवाजमव के ली.

सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेत ग्राहकांच्या आरोग्यासाठी सराफी दुकाने बंद असतांनाही रुग्णांचे नातेवाईक अथवा मित्रपरिवारातील कोणालाही वैद्यकीय कारणासाठी सोने मोड अथवा सोने तारण ठेवण्यासाठी घरपोच सेवा दिली जात आहे. या सेवेचा लाभ जिल्ह्य़ातील बहुतांश रुग्णांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. काहींनी सोने मोड केली. काहींनी सोने तारणचा पर्याय स्विकारला.

रुग्णांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न

करोना महामारीने जीवनमान बदलून टाकले आहे. टाळेबंदीमुळे उद्योग व्यवसायाला फटका बसला आहे. काहींनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. यामुळे नेहमीच्या जगण्याला मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना वैद्यकीय कारणासाठी मोठी रक्कम उभारावी लागत आहे. मात्र घरात रुग्ण असतांना इतरांना घरातून बाहेर पडणे शक्य होत नाही. अशा स्थितीत ग्राहकांना मानसिक आधार मिळावा यासाठी सोने मोड किंवा सोने तारणची घरपोच सेवा दिली जात आहे. ग्राहकांच्या घरी जावून मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतर, हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करत गरजु ग्राहकांना मदत के ली जात आहे. आजवर ग्राहकांना सोने खरेदीचा संदेश दिला जात होता. मात्र या आपत्कालीन परिस्थितीत ग्राहकांना मानसिक आधार देण्यासाठी ही सेवा दिली जात आहे.

– चेतन राजापूरकर (संचालक, चिंतामणी अलंकार)