23 October 2019

News Flash

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

खानगाव सारोळे येथे ही घटना घडली. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

रविवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात निफाड तालुक्यात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. खानगाव सारोळे येथे ही घटना घडली. रविवारी जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाने अनेक घरांची पडझड झाली तसेच पिकांचेही नुकसान झाले. निफाड तालुक्यातील खानगाव सारोळे येथे रात्री अंगावर वीज पडून दत्ता किसन गारे (६०) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

First Published on October 27, 2015 12:41 am

Web Title: farmer dead due to lighting
टॅग Lighting