12 August 2020

News Flash

दरोडय़ाच्या तयारीत असलेले पाच जण गजाआड

मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गस्ती पथक त्या ठिकाणाहून जात असताना हे टोळके संशयास्पदरीत्या उभे असलेले दिसले.

संग्रहित छायाचित्र

नाशिक : तोंडाला फडके बांधून हातात कोयता, मिरची पूड आणि नायलॉन दोरी, अशी घातक सामग्री बाळगत दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीपैकी पाच जणांना मुंबई नाका पोलिसांनी गजाआड केले.

रात्री मुंबई नाका परिसरातील हॉटेल छानच्या पाठीमागील मोकळ्या जागेत काही जणांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गस्ती पथक त्या ठिकाणाहून जात असताना हे टोळके संशयास्पदरीत्या उभे असलेले दिसले.

खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तेथे गेले असता समीर शाह (२३, रा. वडाळा रोड), वसिम शेख (२३, रा. नंदिनीनगर), दीपक गायकवाड (३७, रा. विनय नगर), फकिरा बडे (३१, रा. म्हाडा कॉलनी) आणि किरण खंबाईत ऊर्फ हुक्का या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रवी भामरे ऊर्फ बाळा आणि राहुल हे फरार झाले. पोलिसांनी पाचही संशयितांची तपासणी केली असता त्यांच्याकडे कोयता, मिरची पुडय़ा, नायलॉन दोरी आढळले. या पाचही दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 12:10 am

Web Title: five people who were preparing for the robbery arrested zws 70
Next Stories
1 खरीप हंगामा अंतर्गत ७३ टक्क्य़ांहून अधिक पेरणी पूर्ण
2 करोनाबाधितांची संख्या साडेचार हजारच्या उंबरठय़ावर
3 पीक कर्जपुरवठय़ात गैरव्यवहार झाल्यास बँकांवर कारवाई
Just Now!
X