करोनाचे सावट आणि टाळेबंदीमुळे पर्यटकांचा मात्र ओघ कमी

नाशिक : पावसाच्या रिमझिम सरी. ऊन-पावसाचा खेळ अशा उत्साहपूर्ण वातावरणात निसर्गरम्य अशा घोटी, त्र्यंबके श्वर परिसरात भटंकती करण्यासारखा आनंद काही वेगळाच. या भटकंतीत निसर्गाचा आविष्कार कसा असतो, हे अनुभवयास मिळते. रानफुलांचा बहरलेला ताटवा लक्ष वेधून घेतो. सध्या करोना संकट आणि टाळेबंदीमुळे पर्यटकांचा ओघ आटल्याने रानफु ले अधिकच बहरलेली आहेत.

पावसांच्या सरींनी निसर्गाचा नजाराच बदलून जातो. सर्वत्र हिरवाईचा साज चढलेला आणि झाडे, वेली नव्या रूपाने सजलेली असे चित्र सध्या आहे. पावसाळ्यात हिरवाईने बहरलेल्या निसर्गात सप्तरंगाची उधळण करणारी रानफुले जणू धरतीवरचे इंद्रधनुष्यच समजले जाते. धरणीच्या उदरातून उगविणारे छोटे अंकुर काळाचे भान राखत आपल्यातील सौंदर्य दाखवू लागल्यावर निसर्ग मोठा जादूगार असल्याची खात्री पटते.

श्रावण ते आश्विन या तीन महिन्यांत महाराष्ट्रात रानफुलांचा बहर असतो. नाशिक-त्रंबकेश्वर मार्गाने जाताना घोटीकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो. या रस्त्याने शेकडो रानफुले बघावयास मिळतात. अगदी नखाच्या आकारापासून ते हाताच्या भल्या मोठय़ा पंज्यापर्यंत ती बघता येतात. अग्निशिखा, कीटकभक्ष्यी वनस्पती ड्रोसेरा, सीतेचे आसव, सात वर्षांनी फुलणारी कारवी, दातपाडी, सापकांदा,  कोल्हापुरी चप्पल बनविण्यासाठी लागणारी विंचवी, दुर्मीळ होत चाललेली कं दीलपुष्प, सोनकुसुम, तेरडा, छोटा कल्प, कावळा, स्मिथिया अशी अनेक मजेशीर नावे असणाऱ्या रानफु लांनी बहरलेल्या वनस्पती पाहण्यास मिळतात. चार महिन्यांपासून टाळेबंदीमुळे नाशिककर घराबाहेर पडले नसल्याने पर्यटनस्थळे शांत होती. त्यामुळे फु लझाडांनी बहरलेल्या वनस्पतींचा ताटवा आपले वैभव जपून आहे. रानफुलांविषयी जास्त माहिती नसल्याने एरवी अशा

डोंगर-दऱ्यांच्या ठिकाणी गेलेले नागरिक वनस्पती मुळासह उपटून परसबागेत कु ंडीत लावण्याचा प्रयत्न करतात.

बहुतेक रानफुले फक्त पावसाळ्यात बहरतात. नंतर ती सुकून जातात. अनेक वनस्पती ठरावीक ठिकाणीच पाहावयास मिळतात. अशा अनेक दुर्मीळ वनस्पती त्र्यंबके श्वर, घोटी पर्सिरत पाहावयास मिळतात. नाशिक जिल्ह्य़ातील रानफुलांचा पाहिजे तसा अभ्यास झालेला नाही. ही फुले जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक असून त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.

याविषयी नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी भूमिका मांडली. यंदा करोना संकटामुळे नाशिक परिसरात पावसाळा सुरू झाल्यापासून पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी नसल्याने फुलांचा बहर मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. माळरान, घाटरस्ते, धबधबे आदी परिसरांत वनफुलांच्या चादरी अंथरलेल्या दिसत आहेत. या फुलांचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.