05 August 2020

News Flash

नाशिकमध्ये लग्नाला नकार दिल्यामुळे गँगवॉर; एकाचा मृत्यू

येथील स्टेट बँक चौकात गायकवाड-काळे-दांडेकर या टोळ्यांमध्ये हाणामारी झाली.

नाशिकच्या सिडको परिसरात गुरूवारी टोळीयुद्धाचा थरार पाहायला मिळाला. यावेळी दोन टोळ्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. येथील स्टेट बँक चौकात गायकवाड-काळे आणि दांडेकर या टोळ्यांमध्ये हाणामारी झाली. लोखंडी सळ्या, लाठ्या-काठ्यांनी दोन्ही टोळ्यांतील लोक परस्परांना मारहाण करत होते. यामध्ये अशोक दांडेकर नावाचा इसम ठार झाला असून त्याचा सहकारी तात्या दांडेकर गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही टोळ्यांतील पूर्ववैमन्यासातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या या भागात कडोकट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येथील सिडको परिसरातील इंदिरा गांधी झोपडपट्टीत काळे, दांडेकर आणि गायकवाड ही कुटुंबे वास्तव्याला आहेत. गेल्या महिन्यात २४ एप्रिलला दांडेकर यांच्या मुलीला गायकवाड कुटुंबियांनी मागणी घातली होती. त्यावेळी दांडेकर कुटुंबाने लग्नाला नकार दिल्याने दोन्ही कुटुंबियांमध्ये मोठी हाणामारी झाली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदविण्यात आला असून सध्या गायकवाड कुटुंबातील चौघेजण तुरूंगात आहेत. याच घटनेचा राग मनात ठेवून गायकवाड कुटुंबातील काहीजणांनी आज अशोक आणि तात्या दांडेकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल कळल्यानंतर दांडेकर कुटुंबातील व्यक्तींनी परिसरातील दुकानांची नासधुस सुरू केली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2016 5:49 pm

Web Title: gangwar in nashik one dead
Next Stories
1 बहुसदस्यीय प्रभाग पद्धत सर्वासाठीच डोकेदुखी
2 नाशिकसह जिल्ह्यत रिमझिम
3 डीजीपीनगरमध्ये सहा वाहनांची जाळपोळ
Just Now!
X