News Flash

‘आता सर्व रुग्णालयांच्या प्राणवायू प्रकल्पांची तपासणी’

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायू टाकी गळतीची भुसे यांनी पाहणी केली

कृषिमंत्री दादा भुसे

शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच रुग्णालयांच्या प्राणवायू प्रकल्पांची तपासणी करण्यात येणार आहे. तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाईल, असे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायू टाकी गळतीची भुसे यांनी पाहणी केली, या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानुसार या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्यात येणार असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दु:खद असल्याचेही त्यांनी नमूद के ले. भुसे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. रुग्णालयातील इतर रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत असून आता प्राणवायू गळती पूर्णत: थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे भुसे यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 12:54 am

Web Title: inspection of all hospital oxygen projects now abn 97
Next Stories
1 गळती झालेली प्राणवायूची टाकी दीड महिन्यापासून कार्यान्वित
2 २४ करोनाबाधितांचा हकनाक बळी
3 असा मृत्यू वैऱ्यालाही नको…! 
Just Now!
X