तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील विशेष भूसंपादन कार्यालयातील मंडळ अधिकारी किशोर धर्माधिकारी यास विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड सुनावला आहे.

तक्रारदार व त्यांच्या पत्नीची जमीन राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. मोबदल्यात शासनाकडून मिळालेला धनादेश घेण्यासाठी तक्रारदार हे विशेष भूसंपादन कार्यालयात गेले असता मंडळ अधिकारी किशोर धर्माधिकारी याने पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. तत्कालीन पोलीस निरीक्षक जे. एम. पाटील यांनी १३ मे २०१० रोजी रचलेल्या सापळ्यात धर्माधिकारी यास तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारत असताना ताब्यात घेण्यात आले. धर्माधिकारीविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्य़ाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्याचा गुरुवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रrो यांनी निकाल दिला.