राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जून २०१६ हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात येणार आहे. या अनुषंगाने महिनाभरात हिवताप व इतर कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबर त्याच्या प्रतिरोध उपायांविषयी शहर तसेच ग्राम पातळीवर माहिती दिली जाणार आहे.

याबाबतची माहिती आरोग्य विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. राजीव कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. हिवतापाचे लक्षण, उपचार व हिवताप प्रतिरोधाचे विविध उपाय याची माहिती देण्यात येईल. जून महिन्यातील सुटीचे दिवस वगळता संपूर्ण जिल्हय़ाात कार्यक्रम होणार असून ‘एक दिवस – एक कार्यक्रम’ या प्रकारे ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रांत कृती आराखडा तयार करून हिवताप प्रतिरोध राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अ‍ॅनाफिलीस डासांची मादी चावल्यामुळे हिवताप होतो. त्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. ताप, थंडी, घाम येणे, डोकेदुखी, मळमळ आदी त्याची प्राथमिक लक्षणे आहेत. प्रत्येक वर्षी हिवतापाच्या उद्रेकाने काही मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर, प्रबोधनाचा मार्ग अनुसरण्यात आला आहे. नागरिकांनी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसविण्याबरोबर कीटकनाशक फवारणी करावी, घरावर पडलेल्या सामानाची विल्हेवाट लावावी, घरातील पाणीसाठय़ांना घट्ट झाकणे लावणे, साठवलेले पाणी प्रवाहित करावे, ज्या ठिकाणी शक्य नाही, तेथे गप्पी मासे सोडण्यात यावे आदी सूचना त्यांनी केल्या. घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करून जवळच्या आरोग्य संस्थ्सप्तशृंग गडावर मंजूर कामे प्रलंबितोत रक्ताची तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. कदम यांनी केले. हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसोबत चर्चा सुरू आहे. जलद ताप रुग्ण सर्वेक्षण करण्यात येत असून गाव पातळी ते जिल्हा रुग्णालय यासाठी त्रिस्तरीय यंत्रणा सक्रिय होणार आहे.

vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

जनजागृती फेरी, प्रदर्शन, माहिती पत्रकांचे वाटप आदींचे नियोजन आहे. ग्रामीण आरोग्य, पोषण आहार, स्वच्छता समितीची सभा, सर्व स्तरांवर स्वच्छता मोहीम राबविली जाईल. तसेच स्पर्धामधून याविषयी प्रबोधन करण्यात येणार आहे.