शहराजवळील बिलाडी रस्त्यावर तरुणीचा खून करून प्रेत रसायन टाकून जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मयत तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.
बिलाडी रस्त्यावरील स्टार्च फॅक्टरीपुढे लहान पुलाखाली हा जळालेला मृतदेह आढळून आला. शनिवारी पहाटे काही लोकांना काहीतरी जळत असल्याचा घाण वास आला. त्यामुळे त्यांनी जाऊन बघितले असता मानवी मृतदेह जळत असल्याचे दिसून आले. मृतदेह जाळण्यासाठी कडबाही टाकलेला आढळून आला. यासंदर्भात तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. मध्यरात्रीनंतर कोणीतरी युवतीचा खून करून मृतदेह नष्ट करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी अत्यंत ज्वलनशील रसायन टाकून जाळल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद तालुका पोलिसांनी केली आहे.