News Flash

आश्वासनांच्या स्पर्धेत अपक्षही एक पाऊल पुढे!

निवडणूक म्हटली की, राजकारणाची आवड असणाऱ्या अनेकांना िरगणात उतरण्याचे वेध लागतात.

शाळेसह पोलीस ठाणे उभारण्यापर्यंत आश्वासने

महापालिका निवडणुकीचा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस अवघ्या पाच दिवसांवर आला असताना राजकीय पक्षांकडून जाहीरनामे, वचननामा व प्रचार पत्रकांमधून आश्वासनांचा वर्षांव होत असताना संबंधितांशी स्पर्धा करणाऱ्या अपक्षांनीही आपले प्रभागनिहाय जाहीरनामे थेट जनतेच्या हाती देण्यास सुरुवात केली आहे. अपक्ष उमेदवारांनी गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी थेट स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्यापासून शिक्षणाचे खासगीकरण थांबविण्यासाठी शाळा उभारणीपर्यंतच्या आश्वासनांची यादी पत्रकांद्वारे मांडली आहे. राजकीय पक्षांनी विमानसेवा वा तत्सम पालिकेच्या आवाक्याबाहेरील अनेक आश्वासने दिली असताना या स्पर्धेत अपक्ष उमेदवार मागे नसल्याचे उलट आपण एक पाऊल पुढे असल्याचे संबंधितांच्या वैयक्तिक जाहीरनाम्यांमधून अधोरेखित होत आहे.

निवडणूक म्हटली की, राजकारणाची आवड असणाऱ्या अनेकांना िरगणात उतरण्याचे वेध लागतात. यंदा इच्छुकांचे उदंड पीक आले होते. राजकीय पक्षांकडून तिकीट मिळाले तर ठीक अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या कमी नाही. सेना व भाजपच्या काही उमेदवारांना एबी फॉर्म भरताना झालेल्या गोंधळामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी करणे भाग पडले. यंदा महापालिका निवडणुकीत तब्बल २७५ अपक्ष उमेदवार आहेत. अपक्षांच्या मोठय़ा संख्येमुळे अनेक प्रभागांमध्ये बहुरंगी लढती होत आहेत. महापालिकेवर कब्जा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यांद्वारे आश्वासनांचा पाऊस पाडला आहे.  प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा स्वतंत्र असला तरी अनेक आश्वासने परस्परांशी मिळतीजुळती असल्याचे लक्षात येते. राजकीय पक्षांनी गाजावाजा करीत आपल्या जाहीरनाम्यांचे नेत्यांच्या हस्ते प्रकाशन केले. त्या तुलनेत वैयक्तिक लढणाऱ्या अपक्षांकडे संपूर्ण शहर डोळ्यांसमोर ठेवून जाहीरनामा तयार करणे जिकिरीचे ठरते. या स्थितीत आपल्या प्रभागात काय योजना राबविण्याचा संकल्प आहे, याची माहिती जाहीरनाम्यातून देत आहे. अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी असल्याने प्रत्येकाचा जाहीरनामा तसा वेगवेगळा आहे. काहींनी प्रभागातील योजनांबाबत आश्वासने देताना राजकीय पक्षांनी डावलल्याची सल व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या िरगणात आपले अस्तित्व अधोरेखित करीत निवडणुकीची रंगत वाढवत आहेत. राजकीय पक्ष अवलंबित असलेले सर्व

फंडे अपक्ष उमेदवारही वापरीत आहे. पक्षांनी झिडकारले, तुम्ही स्वीकारा, तुमच्यातलाच एक . गरज केवळ तुमच्या एका मताची.. अशी काही जण भावनिक साद घालत आहे. इतर उमेदवारांप्रमाणे सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडतांना आगामी काळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर काय करणार, यासाठी जाहीरनाम्यातून आश्वासनांचा पाऊस पडत आहे. राजकीय पक्षांप्रमाणे अपक्ष उमेदवारांनी दिलेली अनेक आश्वासने महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील नाही. ही बाब काही उमेदवारांनाही ज्ञात आहे. तरीदेखील राजकीय पक्षांशी स्पर्धा करताना मागे पडू नये यासाठी अशक्यप्राय आश्वासने देण्याची चढाओढ लागली आहे. या सर्व जाहीरनाम्यांमधून मतदारांना शहर विकासाची मनोरंजनात्मक सफर घडत आहे.

अपक्ष जाहीरनाम्यात काय म्हणतात..

  • पीडित महिला व युवतीला दाद मागण्यासाठी प्रभागात प्रथमच स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची स्थापना
  • महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे कक्ष असलेला सरकारी दवाखाना
  • शिक्षण संस्थांचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी इंग्रजी माध्यमाची शाळा, प्रभागात स्वतंत्र टपाल कार्यालय, –
  • परिसरातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी स्वतंत्र पर्यटनस्थळाची निर्मिती,
  • वेशीवरचा कचरा डेपोचे स्थलांतर
  • युवती व महिलांसाठी समुपदेशन केंद्र,
  • विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालक व मालक यांचा विमा
  • नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी ध्यान केंद्र, बँक व सुविधा केंद्र २४ तास चालण्यासाठी प्रयत्न

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:23 am

Web Title: nashik elections 2017 2
Next Stories
1 लक्षवेधी लढत : पक्ष बदलून पुन्हा आमने-सामने
2 राज्य शासन म्हणजे ‘इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी’
3 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आम्ही जाहीर पाठींबा देऊ- उद्धव ठाकरे 
Just Now!
X