नाशिकमधील गंगापूर रोड येथील वसाहतीत बिबट्या घुसला असून बिबट्याच्या हल्ल्यात शिवसेना नगरसेवक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात दोन नागरिकही जखमी झाले असून वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

गंगापूर रोडवरील सावरकर नगर या निवासी भागात शुक्रवारी सकाळी बिबट्या घुसला. बिबट्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळात बिबट्याने दोन नागरिकांवरही हल्ला केला. यात शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.  बिबट्या वस्तीत घुसल्याचे समजताच वनविभागाचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.