पक्क्या वाहन परवान्यासाठी समान चाचणी देऊनही तुम्ही एकाला उत्तीर्ण केले आणि मला अनुत्तीर्ण असे का, एक खिडकी योजना कार्यान्वित असताना नागरिक थेट कार्यालयात कसे शिरतात, वाहन व वाहनधारकांशी निगडित सर्व कामे ऑनलाइन होऊनही परिसरात दलालांची भ्रमंती कशासाठी, प्रादेशिक परिवहनचे कर्मचारी कामाच्या वेळेत कुठे अंतर्धान पावतात.. यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाचणी मार्गासह कार्यालयातील वेगवेगळ्या ठिकाण सीसी टीव्ही कॅमेऱ्याची आता नजर असणार आहे. १८ ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले असून ते कार्यान्वित झाले आहेत.

शासनाकडून उपलब्ध झालेल्या एक लाख रुपयांच्या निधीतून कार्यालयात सीसी टीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभागात काही काम असेल तर बहुतांश नागरिक नाक मुरडतात. शासकीय लालफितीच्या कारभारावर बोट ठेवत संबंधितांकडून दलाल व तत्सम पर्याय स्वीकारले जातात. परिणामी, या कार्यालयाशी निगडित दलालांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दलालांशी सौहार्दपूर्ण संबंध असल्याने त्यात सर्वसामान्य भरडला जातो. या एकंदर स्थितीत सर्व घटकांना चाप लावण्यासाठी ही व्यवस्था महत्वपूर्ण ठरणार आहे.

ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन

वास्तविक, अलीकडेच कार्यान्वित झालेल्या नवीन प्रणालीमुळे चालकास अर्ज भरणे वा तत्सम बाबींसाठी येण्याचीही गरज राहिलेली नाही. घरी बसून तो ऑनलाइन अर्ज व कागदपत्रे सादर करू शकतो. कच्च्या परवान्यासाठी परीक्षा व पक्क्या परवान्यासाठी केवळ चाचणी देण्याकरिता कार्यालयात यावे लागणार आहे. पक्का वाहन परवाना काढताना दुजाभाव झाल्याची अनेकांची भावना होते. इतरांप्रमाणे वाहन चालवूनही आपणास जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण केल्याची तक्रार काही चालक करतात. आता अशी शंका कोणी उपस्थित केली तर कॅमेऱ्यावरील चित्रणावरून त्याचे निरसन करता येईल. त्यात नेमका दोष चालक की अधिकाऱ्याचायाचाही उलगडा होणार आहे. त्यासाठी चाचणी मार्गावर खास दोन स्वतंत्र सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यात ३०० अधिकृत सुविधा केंद्र कार्यान्वित केली आहेत. या ठिकाणी २० रुपयात ऑनलाइन अर्ज भरता येईल. काही दिवसांपूर्वी काही दलाल मंडळींनी चारचाकी वाहनांत लॅपटॉपद्वारे कार्यालयाबाहेर १०० रुपये घेऊन अर्ज भरून देण्याचा प्रकार सुरू केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा संबंधितांचे लॅपटॉप जमा करण्याची कारवाई केली गेल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यालयीन वेळेत काम करणे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. खिडकी व वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी अनेकदा आपल्या जागेवर दिसत नाहीत. अशा सर्व घटकांवर सीसी टीव्ही व्यवस्थेने नियंत्रण ठेवले जाणार आहे. तसेच अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कधी येतात, कधी जातात याची नोंद ठेवण्यासाठी बोटाच्या ठशांची नोंद ठेवणारी (थम इंप्रेशन) यंत्रणा बसविण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत १८ कॅमेरे कार्यान्वित झाले असून शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यांची संख्या वाढविली जाणार आहे. नागरिकांनी आपल्या कामांसाठी दलालांची मदत घेऊ नये, असे आवाहन कार्यालयाने केले आहे.

रविवारीही कामकाज

प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज रविवारीदेखील सुरू राहणार आहे. नव्या प्रणाली कार्यान्वित होताना काही तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी आल्या. ही प्रणाली समजून घेण्यास काही अवधी लागेल. मध्यंतरी काही कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी वर्ग झाले होते. यामुळे पक्क्या स्वरूपाच्या वाहन परवान्याची ६०० ते ७०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावण्यासाठी सुटीच्या दिवशीही कामकाज करण्यात येणार आहे.