पाणीटंचाईचे संकट अधिक गडद

नाशिक : होळी आणि पाठोपाठ येणाऱ्या रंगपंचमी सणावर दुष्काळाचे सावट असून तापलेल्या वातावरणात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून १३८ गावे आणि ४४० वाडय़ांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
Worker dies due to suffocation in sewage tank
वसई : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून कामगाराचा मृत्यू
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

ग्रामीण भागात पिण्यासाठी पाणी नसल्याने हा सण साजरा होणार नसल्याची स्थिती असून शहरी भागात पाण्याचा अपव्यय होऊ नये या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली आहे. एकंदर स्थितीत कोरडी रंगपंचमी खेळण्याचा पर्याय उपलब्ध आहे. नाशिकमधील प्राचीन परंपरा लाभलेल्या रहाडी टंचाईमुळे याआधीही काही वेळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यंदा काय निर्णय होतो, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नाशिकमधील प्राचीन परंपरा लाभलेल्या रहाडी खोदल्या गेल्या नव्हत्या. इतकेच नव्हे तर येवल्यात दरवर्षी रंगणाऱ्या रंगांच्या सामन्याला तेव्हां स्थगिती दिली होती. नाशिक महापालिकेने रंगपंचमीसाठी राजकीय पक्ष, संघटना किंवा संस्थांना

पाण्याचे टँकर दिले नव्हते. या वर्षी त्यापेक्षा गंभीर स्थिती असल्याने तसाच मार्ग अनुसरला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अडकले आहेत. त्यांच्यामार्फत यावेळी तसा पुढाकार घेतला जातो की नाही, हा कळीचा मुद्दा आहे.

टंचाईचे संकट भेडसावत असताना रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळून हा उत्सव साजरा व्हावा, यादृष्टीने विचार करावा लागणार आहे. शहरातील जुन्या नाशिक परिसरात चौकोनी रहाडींमध्ये रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्याकरिता मोठय़ा प्रमाणात पाणी लागते. रहाडीत रंगपंचमी साजरी केल्यास पाण्याचा अपव्यय होण्याची शक्यता असते. दुष्काळात अनेक मंडळांनी कोरडी रंगपंचमी साजरी केल्याची उदाहरणे आहेत. रेन डान्स वा तत्सम प्रकारांना फाटा देण्याचा विचार करावा लागणार आहे.  दुष्काळात पाण्याचा काटेकोरपणे वापर होणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

पाण्याच्या टँकरबाबतचा निर्णय प्रशासन लवकरच घेणार आहे.

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात नेहमीप्रमाणे रंगपंचमी साजरी केली जाणार नाही. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मारामार असताना रंगपंचमीसाठी पाणी कुठून आणणार, हा प्रश्न आहे.

जिल्ह्य़ातील जवळपास नऊ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून इतर तालुक्यात फारशी समाधानकारक स्थिती नाही. टंचाईग्रस्त गावांची संख्या पुढील काळात आणखी वाढणार आहे. दीड लाख लोकसंख्येच्या मनमाड शहरास २० दिवसाआड पाणी पुरवठा होतो. येवल्यात कमी-अधिक फरकाने अशीच स्थिती आहे. नाशिक शहरात सध्या  पाणी कपात नसली तरी रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता बाळगली जाणार आहे. मागील एका दुष्काळी वर्षांत अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडी रंगपंचमी खेळण्याकडे राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी लक्ष केंद्रित केले होते.