केवळ २६ टक्के शेतकऱ्यांचा सहभाग

जिल्ह्यतील जवळपास एक लाख १० हजार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदवला. म्हणजे केवळ २६ टक्के  शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. या शेतकऱ्यांनी त्यांच्या वीज देयकापोटी ५३ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. एकूण आकडेवारी पाहिल्यास जवळपास दोन लाख म्हणजे ७४ टक्के ग्राहकांनी या योजनेकडे पाठ फिरविली आहे.

थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीज देयक भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना आणली.

या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या थकित वीज देयकातील दंड-व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू देयकासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली.

शेवटच्या टप्प्यात योजनेला प्रतिसाद वाढविण्यासाठी ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकीसाठी तीन तर ३० हजारांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी पाच हजार रुपये भरून योजनेचा लाभ देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच वीज देयकाबाबतच्या सर्वच शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबर महिन्यात फिडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले.

योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच ३० नोव्हेंबपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ९ हजार ५३३ कृषिपंप ग्राहकांनी महावितरणकडे भरणा केला आहे. एकूण थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांच्या तुलनेत ३६ टक्के ग्राहकांनी योजनेत सहभाग नोंदविला.

नाशिक शहर मंडलात नाशिक शहर (एक) १३४६ ग्राहक, ७९ लाख, नाशिक शहर (दोन) ७८९९ ग्राहक, पाच कोटी कोटी एक लाख, नाशिक ग्रामीण २१ हजार ९७४ ग्राहक, ११ कोटी ६९ लाख, चांदवडमध्ये २५ हजार ३२ ग्राहक, १२ कोटी ८२ लाख रुपये. नाशिक शहर मंडलात एकूण ५६ हजार २५१ ग्राहकांनी ३० कोटी ३२ लाख रुपये जमा केले. मालेगाव मंडलात मालेगावमध्ये १५ हजार ७८३ ग्राहक, ४ कोटी ९३ लाख, मनमाड १२ हजार ३९० ग्राहक, चार कोटी ९७ लाख, सटाणा ११ हजार ८७५ ग्राहक, पाच कोटी १७ लाख, कळवणमध्ये १३ हजार २३४ ग्राहक, सात कोटी ८७ लाख रुपये. मालेगाव मंडलात एकूण ५३ हजार २८२ ग्राहकांनी २२ कोटी ९४ लाख रुपये जमा केले.

एक लाख कृषिपंपधारकांना लाभ

जिल्ह्यतील तीन लाख ५ हजार २२२ कृषिपंपधारक शेतकरी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्र ठरले होते. या ग्राहकांकडे वीज देयकाची ७६६ कोटी रुपये मूळ रकमेची वीज देयके थकित आहेत. अंतिम मुदतीत जिल्ह्यातील एक लाख ९ हजार ५३३ कृषिपंप ग्राहकांनी महावितरणकडे भरणा केला आहे. उर्वरित एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी सुलभ हप्ते तसेच व्याज, दंडमाफीसह थकबाकीमुक्त होण्याची संधी गमावली आहे.