News Flash

पोलिसाची गुंडगिरी; बिल मागणाऱ्या बार चालकाला मारहाण

मी पोलीस असून, तुला बघून घेतो

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला की, पोलीस आलेच. शांतता नांदावी म्हणून राज्यभरात पोलीस दिवसरात्र कर्तव्य बजावतात. मात्र, पोलिसांच्या नावाला गालबोट लावणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. बिलाचे पैसे मागणाऱ्या बार चालकाला एका पोलीस कर्मचाऱ्याने गुंडाच्या मदतीनं मारहाण केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या लेखा नगर भागात एक बार आहे. या बारमध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारांसोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी यांनी जाधव यांच्याकडे पैशांची मागणी केली. जाधव यांनी पैसे न देता बारचालकाशी वाद घालण्यास सुरूवात केली. ‘मी पोलीस असून, तुला बघून घेतो,’ असं भगवान यांनी बारचालकाला शिवीगाळही केली.

त्यानंतर भगवान जाधव यांनी त्याच्या साथीदारांसोबत या बारचालकाला मारहाण केली. पोलीस कर्मचारी भगवान जाधव यांच्यासोबत असलेले त्यांचे साथीदार हे सराईत गुन्हेगार असल्याचं या घटनेनंतर समोर आलं आहे. बारचालकाला मारहाण केल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर अंबड पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. विश्वास नांगरे पाटील हे नाशिकचे पोलीस आयुक्त असून, नाशिक पोलीस भगवान जाधव यांच्याविरुद्ध काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 1:26 pm

Web Title: police beaten to bar owner in nashik bmh 90
Next Stories
1 कधी कधी कमी गुण मिळवणारा व्यवहारात हुशार असतो
2 १५८० कोटींच्या आराखडय़ास मंजुरी
3 बँक कर्मचारी संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प
Just Now!
X