News Flash

टेम्पोची दुचाकीला धडक; हवालदार ठार

शहरातील त्र्यंबकरोडवरील शरणपूर सिग्नल चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेने दुचाकीवरील हवालदाराचा मृत्यू झाला.

शहरातील त्र्यंबकरोडवरील शरणपूर सिग्नल चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेने दुचाकीवरील हवालदाराचा मृत्यू झाला. टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्री मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदार धनराज दत्तू जाधव (३५) हे मित्र रमाकांत गायकवाड यांच्या मोटारसायकलवरून उंटवाडीरोडवरील दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या दिशेने येत होते. सातपूरकडून शरणपूर सिग्नलच्या दिशेने येणाऱ्या भरधाव टेम्पोने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात जाधव आणि गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली. जाधव यांचा अतिरक्तस्रावाने जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारवाडा पोलिसांनी संशयित टेम्पोचालक नईम शौकत शेख (३५) यास अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 1:11 am

Web Title: police constable death in road accident
Next Stories
1 शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय शिबिरातही भाजप लक्ष्य ?
2 तृप्ती देसाईंमागे अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस सक्रिय
3 महिला बचत गटाच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक
Just Now!
X