आगामी महापालिका निवडणूक, दुष्काळ व टंचाई परिस्थिती तसेच भाजप प्रदेश कार्यकारिणीची अलीकडेच झालेली बैठक या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे विभागीय शिबीर २४ एप्रिल रोजी येथे होत आहे. सकाळी साडेनऊपासून गंगापूर रस्त्याजवळील चोपडा बँक्वेट हॉलमध्ये शिबिरास सुरुवात होणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होणार आहे.
शिबिरात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्य़ांचे सर्व जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख तसेच सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सभागृहाच्या प्रांगणात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील स्मृतिस्थळाच्या धर्तीवर शक्तीस्थळ उभारण्यात आले आहे. सकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. शिबीरस्थळाचे विमादी पटवर्धन सभागृह असे नामकरण करण्यात आले असून शिबिरात त्यांच्या कार्याविषयी विचारमंथन होणार आहे. शिबिराच्या औपचारिक उद्घाटनानंतर दादा भुसे हे प्रास्ताविक करतील. सर्वप्रथम एकनाथ शिंदे, त्यानंतर उपनेते गुलाबराव पाटील हे ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा व उपाययोजना’ या विषयावर तसेच रवींद्र मिर्लेकर हे ‘संघटना बांधणी’विषयी मार्गदर्शन करतील. नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘शिवराय ते शिवसेनाप्रमुख’, अभिजीत घोरपडे यांचे ‘पाणीप्रश्न व उपाययोजना’ तर ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर हे राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून शिवसेना व समाज यांच्या नात्यावर भाष्य करतील. या वेळी राजेंद्र जाधव लिखित ‘नारपार दमणगंगेतून समृद्धीकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन होईल. शिबिराचा समारोप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होईल. शिबिराची जय्यत तयारी झाली असून शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
Bhandara, Nana Patole car accident
नाना पटोलेंच्या कारला अपघात; उभ्या गाडीला भरधाव ट्रकची धडक
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर