News Flash

करोना लसीकरणासाठी जाताना सहव्याधीग्रस्तांनी काळजी घ्यावी

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांचा समावेश केला जात आहे.

लसीकरणासाठी जाण्यापूर्वी नाष्टा किंवा जेवण करून नियमित औषधे घेण्यात यावीत. ६० वर्षे वय पूर्ण असलेल्या व्यक्तींनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र इत्यादी मूळ प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : करोना महामारीवर उपाययोजना म्हणून ४५ ते ६० आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली असून या वयोगटातील सहव्याधीग्रस्त (कोमॉर्बिड) नागरिकांनी लसीकरणासाठी येताना काळजी घ्यावी, आपल्या घराजवळील शासकीय लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे यांनी के ले आहे.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांचा समावेश केला जात आहे. जिल्हा परिसरात सोमवारी लसीकरणास सुरुवात झाली असताना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील लसीकरण के ंद्रात मात्र शांतता होती. यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत फिरावे लागले. मंगळवारपासून जिल्हा रुग्णालयातील लसीकरण के ंद्रात मोहिमेला सुरुवात झाली. याविषयी डॉ. रावखंडे यांनी माहिती दिली.

लसीकरणासाठी जाण्यापूर्वी नाष्टा किंवा जेवण करून नियमित औषधे घेण्यात यावीत. ६० वर्षे वय पूर्ण असलेल्या व्यक्तींनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र इत्यादी मूळ प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ४५ ते ६० वयोगटातील उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या कोमॉर्बिड नागरिकांनी लसीकरणाच्या वेळी येताना विहित नमुन्यातील स्वत:स असे आजार असल्याचे पुरावे सोबत आणणे गरजेचे आहे.

तसेच पिण्याच्या पाण्याची बाटली आणावी, सोबत तरुण नातेवाईक आणि नियमित सुरू असलेली औषधे ठेवावीत. लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याची मर्यादा लक्षात घेता दिलेल्या वेळेतच लसीकरणासाठी उपस्थित राहावे, अशी सूचना डॉ. रावखंडे यांनी के ली. जिल्हा सामान्य रुग्णालय पश्चिम विभाग अंतर्गत येत असल्याने तेथील नागरिकांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणासाठी यावे, असे आवाहनही डॉ. रावखंडे यांनी के ले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 2:14 am

Web Title: take care of ill people while going for corona vaccination dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 दर बुधवारी सौंदाणे,वडनेरसह पाच आरोग्य केंद्रांवर करोना लसीकरण
2 कळवण, देवळ्यातील वीजपुरवठा वारंवार खंडित
3 पुनद खोऱ्यातील शेतकऱ्यांचे विजेसाठी तीन तास ठिय्या आंदोलन
Just Now!
X