21 September 2020

News Flash

मुंढेंच्या बदलीनंतरचा आनंदोत्सव महागात, अज्ञातांवर गुन्हा दाखल

मुंढे हे पालिकेतून निघून गेल्यानंतर सत्ताधारी-विरोधी सदस्यांकडून आनंदोत्सव सुरू झाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडले होते.

संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्रक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पोलिसांना देण्यात आले आहे.

तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरुन बदली करण्यात आल्यानंतर महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडणे भाजपा कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांसदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौर रंजना भानसी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ‘आम्ही नाशिककर’ या संघटनेतर्फे करण्यात आली होती. ज्यानंतर पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी तुकाराम मुंढे यांची नाशिकच्या आयुक्तपदावरुन करण्यात आली. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर मुंढे यांनी क्षणाचाही विलंब न करता खिन्न मनस्थितीत पालिका मुख्यालय सोडले. मुंढे हे पालिकेतून निघून गेल्यानंतर सत्ताधारी-विरोधी सदस्यांकडून आनंदोत्सव सुरू झाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडले होते. याविरोधात ‘आम्ही नाशिककर’ या संघटनेने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

सुप्रीम कोर्टाने फटाके फोडण्यासंदर्भात आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन भाजपाच्या महापौर रंजना भानसी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. याचे अनुकरण सर्वसामान्यांकडूनही केले जाऊ शकते. त्यामुळे संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, असे पत्रक संघटनेच्या वतीने शुक्रवारी पोलिसांना देण्यात आले आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. त्यामुळे फटाके फोडणे हे आता भाजपा कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 2:41 pm

Web Title: tukaram mundhe transfer bjp worker firecrackers celebration violates sc restriction demand police action
Next Stories
1 नाशिकमध्ये भररस्त्यात तरुणाची हत्या
2 ..आणि मुंढेंनी मुख्यालय सोडले
3 पालिका सुरक्षा व्यवस्थेचा ठेका रद्द
Just Now!
X