अंतराळ समुपदेशक अपूर्वा जाखडी यांचे आवाहन

नाशिक : सरकार निर्मितीची प्रक्रिया ज्या नागरिकांच्या मतांवर ठरते, त्यांच्याही काही अपेक्षा आहेत. सरकारी कार्यालयीन सेवा ऑनलाइन करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नोकरी यांची सांगड, शहरांमधील प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन, विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर आदींकडे भावी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन अंतराळ समुपदेशक अपूर्वा जाखडी यांनी केले.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
ajay kumar sood on country economic growth
स्वदेशी विज्ञान-तंत्रज्ञानाविना देशाचा विकास अशक्य!
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
ग्रामविकासाची कहाणी

देशात पारदर्शक सरकार हवे, ही प्रत्येकाची अपेक्षा असते. सरकारी कार्यालयात चकरा मारण्यात नागरिकांचा बराच वेळ जातो. प्रत्येक सरकारी कार्यालयीन सेवेत ऑनलाइन, इ सेवेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कामात गतिमानता येईल; जेणेकरून सामान्यांना रांगेत उभे राहणे, आपल्या कामासाठी चकरा मारणे कमी होईल, असेही जाखडी यांनी सांगितले. काही वर्षांत स्मार्ट सिटीबद्दल बरेच मंथन झाले आहे. आता त्या दृष्टिकोनातून पावले उचलली जाणे आवश्यक असल्याचे सांगून जाखडी म्हणाल्या, स्मार्ट रस्ते, सायकल मार्गिका, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दूरवरील अंतरासाठी जलद वाहतुकीचे पर्याय आदींसाठी पायाभूत सुविधा उभारणीचे काम होणे गरजेचे आहे.

प्रत्येक शहराची गरज, त्यादृष्टीने नियोजन आणि अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. महानगरांसह देशातील बहुतांश शहरे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत.

हवेतील प्रदूषणाने आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या समस्येतून सुटका करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायाचा स्वीकारावा लागेल. त्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांची उपलब्धता, चार्जिगसाठी केंद्रांची उभारणी यासाठी पुढाकार घेतल्यास वाहनधारक त्याचा नक्कीच विचार करतील.

विज्ञान तंत्रज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासात करता येईल. शेती, शेतकरी डोळ्यासमोर ठेवून उपग्रह बांधणीला प्राधान्य देता येईल. हवामानाचा अंदाज किंवा तत्सम बाबींसाठी उपग्रहावरून महत्त्वाची माहिती मिळते. तिचा उपयोग कृषि उत्पादन वाढविण्यास होईल. भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

मुळात शिक्षणावरील खर्च ही देशासाठी गुंतवणूक असते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सरकारने आवश्यक ती तरतूद करायला हवी.

रोजगार उपलब्ध करेल असे शिक्षण आवश्यक आहे. उच्चशिक्षण घेऊन अनेक युवक परदेशात स्थायिक होतात. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशालाच व्हायला हवा अशी व्यवस्था आणि  वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचेही जाखडी यांनी सांगितले.