जिल्ह्य़ातील १३८ गावे, ४४० वाडय़ांना टँकरने पाणी

तापलेल्या वातावरणात पाणीटंचाईचे संकटही गडद होत आहे. शहरात टंचाई नसली तरी ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. सध्या १३८ गावे आणि ४४० वाडय़ांना एकूण १४० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मनमाड शहरास २० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. येवल्यात कमी-अधिक फरकाने हीच स्थिती आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या पुढील काळात वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

समाधानकारक पावसाअभावी धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. टंचाईचे संकट तीव्र होण्यात हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. दीड लाख लोकसंख्येच्या मनमाड शहरास २० दिवसाआड पाणीपुरवठा होतो. मनमाड-येवल्यात पाणीबाणी निर्माण झाल्यानंतर पालखेडमधून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये पाणी आरक्षित असल्याने पुरवठय़ात कपात करण्याची वेळ आली नाही. पावसाळ्यापर्यंत पावसाची तजवीज आहे. मात्र इतरत्र विपरीत चित्र आहे.

येवला तालुक्यात गंभीर स्थिती असून ४९ गावे आणि २९ वाडय़ांना २९ टँकरने पाणी दिले जात आहे. बागलाण तालुक्यात २७ गावे, दोन वाडय़ांना २१ टँकर, चांदवड तालुक्यात चार गावे, पाच वाडय़ा, देवळा तालुक्यात सात गावे, १६ वाडय़ा, मालेगाव तालुक्यात २१ गावे आणि ६८ वाडय़ा, नांदगाव तालुक्यातील १४ गावे आणि १२६ वाडय़ा तसेच सिन्नर तालुक्यातील १६ गावे आणि १९४ वाडय़ांना टँकरने पाणी पुरविले जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात अद्याप एकही टँकर सुरू करावा लागलेला नाही. परंतु दुर्गम आदिवासी भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

६७ विहिरी अधिग्रहित

पाण्याची उपलब्धता करण्यासाठी विहिरी अधिग्रहित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत गावांसाठी ३५, तर टँकरसाठी ३२ अशा एकूण ६७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यात बागलाण तालुक्यात १०, देवळा सहा, मालेगाव २९, नांदगावमधील १७, सिन्नर तीन आणि येवल्यातील दोन विहिरींचा समावेश आहे.