scorecardresearch

नंदुरबार जिल्ह्याला आरोग्य सुविधेसाठी १३ कायाकल्प पुरस्कार

नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उत्कृष्ठ वातावरण निर्माण करुन चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून सुरु

नंदुरबार जिल्ह्याला आरोग्य सुविधेसाठी १३ कायाकल्प पुरस्कार
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उत्कृष्ठ वातावरण निर्माण करुन चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या कायाकल्प पुरस्कार योजनेतंर्गत २०२१-२२ या वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्याला १३ पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी यांनी दिली आहे.

हेही वाचा >>>नाशिक: शहरात नायलॉन मांजाची विक्री सुरुच; दोन जणांविरुध्द गुन्हा

यात जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूरचे उपजिल्हा रुग्णालय, खोंडामळी आणि खांडबारा ग्रामीण रुग्णालय तसेच खापर, बोरद, सोमावल, नटावद, तलई, सुलवाडे, कुसूमवाडा या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लहान शहादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नांदरखेडा आरोग्यवर्धिनी उपकेंद्र यांना प्राप्त झाला आहे.

हेही वाचा >>>नाशिक: वाहून गेलेल्या बेसाल्ट शोधासाठी गोदापात्र कोरडे करणार; कुंड काँक्रिटीकरणमुक्तीसाठी काम पुन्हा सुरू करण्याची तयारी

१५ मे २०१५ पासून कायाकल्प पुरस्कार देण्यात येत आहेत. योजनेत सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांना सहभागी होता येते. पुरस्कारासाठी रुग्णालयांची अंतर्गत व बाह्य परिसरातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, खाट स्वच्छता, उपलब्ध साधनांचा वापर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता, रुग्णसेवा, जैववैद्यकीय घन व द्रवरुप कचऱ्यांची विल्हेवाट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाणीबचत, सांडपाण्याचा निचरा आदी प्रत्येक बाबींसाठी गुण देण्यात येतात.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 13:58 IST

संबंधित बातम्या