लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: नव्या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा विविध उपक्रमांनी होत असतांना शहरात शैक्षणिक संस्थांमध्ये वादाची घंटा वाजली. बॉईज टाऊन पब्लिक स्कुलमध्ये शुल्क भरण्यावरून दोन पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद सुरू असून या वादाचे पर्यावसान विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात झाले आहे. शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिला आहे.

rishi sunak
ब्रिटनमध्ये स्थलांतरितांचं प्रमाण घटवणार, नव्या नियमांमुळे ८० टक्के अर्जांमध्ये घट; ऋषी सुनक यांची माहिती
question paper, late, law students,
विधि शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हाती एक तास उशिरा प्रश्नपत्रिका, मुंबईतील न्यू लॉ महाविद्यालयातील प्रकार
right to education latest marathi news, right to education marathi news
शिक्षण हक्क हवा, मात्र पात्र विद्यार्थ्यांसाठीच!
survey, mental health, medical students,
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत सर्वेक्षण करणार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Assistant Police Inspector promoted soon
आनंदाची बातमी! सहायक पोलीस निरीक्षकांना लवकरच पदोन्नती
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?

बॉईज टाऊन पब्लिक स्कुल शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरलेले नाही. या कारणावरून त्यांना वर्गात बसू दिले जात नाही. याविषयी पालक सुनील इंगळे आणि ॲड. मृत्यूंजय कुटे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. पालकांनी आपली भूमिका मांडली. नवीन शैक्षणिक वर्षात मुलांना शाळेत पाठवले असता शाळा व्यवस्थापन त्यांना प्रवेशद्वारातूनच घरी पाठवून देत आहे. वास्तविक शाळेचे ४०,८०० रुपये भरण्यास आम्ही तयार आहोत. परंतु, हे शुल्क ज्या कारणासाठी घेण्यात येत आहे, त्याची वर्गवारी द्यावी, अशी पालकांची मागणी आहे. परंतु, शाळा विद्यार्थ्यांना बसू देत नाही.

आणखी वाचा-जळगावात २७ जूनला शासन आपल्या दारी कार्यक्रम; जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

याबाबत शिक्षण अधिकारी माध्यमिक-प्राथमिक, शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार करण्यात आली. शाळेला उपसंचालक डॉ. चव्हाण यांनी पत्र दिले. विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणे हे बालकाच्या मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियमांचे उल्लंघन आहे. शाळेच्या वतीने सुरू असलेला कारभार हा बाल हक्काचे उल्लंघन करणारा असल्याचे म्हटले आहे. याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे सुनावणी झाली. शाळेने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून एकही दिवस वंचित ठेवू नये, अन्यथा गंभीर स्वरूपाच्या कारवाईला शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांना सामोरे जावे लागेल, अशा सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळेचे वेतन तसेच वेतनेतर अनुदान, विद्यार्थ्यांना जोपर्यंत शाळा प्रवेश देत नाही, तोपर्यंत रोखून ठेवण्याची सूचनाही डॉ. चव्हाण यांनी केली आहे.

पालकांना मदत करणार

बॉईज टाऊन शाळा व्यवस्थापनाविषयी तक्रार असलेल्या पालकांनी समोरासमोर येऊन बोलावे. पालकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरायचे नाही. तक्रारदार पालक प्रत्यक्ष भेटत नाहीत. लोकप्रतिनिधी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करतात. पालकांना एका नमुन्यात शुल्क वर्गीकरण अपेक्षित आहे. असे कुठल्याही कायद्यात नाही. केवळ या दोन पालकांना याविषयी तक्रारी आहेत. पालकांना शुल्क सवलतीचा प्रस्ताव दिला आहे. पालकांना मदत करायची आहे. -रतन लथ ( पी. एन. मेहता एज्युकेशन ट्रस्ट बॉईज टाऊन पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय)