अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर भाजपने राम मंदिराचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी आणला असताना दुसरीकडे काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रेतून खासदार राहुल गांधी यांची निस्सीम शिवभक्त अशी प्रतिमा तयार करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे उघड होत आहे.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Uneasiness in Congress as Priyanka Gandhi is not getting a meeting
चंद्रपूर : प्रियंका गांधींची सभा मिळत नसल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची सभाही रद्द
Devrao Bhongle, Congress, BJP
भाजपचे नेते देवराव भोंगळे म्हणतात, “पराभव दिसू लागताच संभ्रमाचे राजकारण करण्याची काँग्रेसची…”
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

हेही वाचा >>> सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, गरीब महिलांना दरवर्षी एक लाख रुपये… राहुल गांधी यांची हमी

यात्रेदरम्यान देशातील १२ ज्योर्तिलिंगांपैकी दोन ठिकाणी गांधी यांनी पूजा केली. गुरुवारी ते त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात अभिषेक करतील, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आवर्जुन सांगतात. भाजपच्या राम मंदिर प्रचाराला काँग्रेस राहुल गांधी यांच्या शिव मंदिर भेटीतून प्रत्युत्तर देत असल्याचे अधोरेखीत होत आहे.  महाराष्ट्रात दाखल झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेत गुरुवारी सायंकाळी राहुल गांधी यांचा त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक हा कार्यक्रम आधीपासून समाविष्ट आहे. दुपारी नाशिक शहरात रोड शो झाल्यानंतर गांधी यांनी पंचवटीतील श्री काळाराम मंदिरास भेट द्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती.  परंतु, काँग्रेसने पूर्वनियोजित कार्यक्रम बदलला नाही. काँग्रेसला श्रीरामाचे काही वावडे नाही, पण यात्रेचा मार्ग वेगळा असल्याने ते काळाराम मंदिरात जाणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.