नाशिक : माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढत असून, भविष्यात ते प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असेल. माहिती तंत्रज्ञानाच्या फायद्यांप्रमाणेच धोकेदेखील आहेत. त्यामुळे त्याचा वापर करताना सायबर जागरूकता असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांनी केले.
येथे नवजीवन विधी महाविद्यालय आणि इएसडीएस सॉफ्टवेअर सोलुशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर जागरूकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेख यांनी मार्गदर्शन केले. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना पुरेशा माहितीआभवी चुका होण्याची शक्यता असते. यातून आपली फसवणूक होऊ शकते. बँकिंगचा वापर करताना आपले पिनकोड सुरक्षित ठेवणे, समाज माध्यमाचा वापर करताना आपले छायाचित्र तसेच इतर माहिती चोरी होऊन त्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे शेख यांनी सांगितले. इएसडीएसचे संचालक पीयूष सोमाणी यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात दिवस-रात्र काम करणाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत अधिक सजग असणे गरजेचे असल्याचे नमूद केले. नवजीवन विधी महाविद्यालयात सुरू होणाऱ्या सायबर सुरक्षा अभ्यासक्रमासाठी इएसडीएसकडून विद्यार्थी पाठविण्याची ग्वाही सोमाणी यांनी दिली.
यावेळी प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार लिखित ‘इण्टड्रक्शन टू इथिकल हॅकिंग अॅाण्ड सायबर लॉ’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर सायबर ॲड. दिलपालसिंग राणा, तन्मय दीक्षित, नवजीवनचे सचिव विजय काळे, सोमनाथ चौधरी हेही उपस्थित होते. ॲड. राणा यांनी ‘इण्टड्रक्शन टू इथिकल हॅकिंग ॲण्ड सायबर लॉ’ या पुस्तकातून नागरिकांना उपयुक्त माहिती उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. दीक्षित, काळे, चौधरी यांनीही मार्गदर्शन केले.
प्राचार्या शहिस्ता इनामदार यांनी सध्या प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी आल्याने समाज माध्यमांसह विविध ॲप, संकेतस्थळ आदींचा वापर वाढला असल्याकडे लक्ष वेधले. वापरकर्त्यांना त्यांची पुरेशी जाण नसल्यास फसवणूक होऊ शकते. एका क्लिकवर जशी हवी
ती माहिती मिळवता येऊ शकते, तसेच एका क्लिकवर वापरकर्त्यांचे बँक खाते शून्यावर येऊ शकते. त्यामुळे सायबर सुरक्षा महत्त्वाची असून, पुस्तकातून याबाबत अधिक विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. याप्रसंगी महेंद्र वचूरकर, अनिल देशमुख, प्रा मकरंद पांडे, ग्रंथपाल मंगल पाटील, प्रा. शालिनी घुमरे आदी उपिस्थत होते.
यशस्वी पवारने सूत्रसंचालन केले. प्रियंका ओसवालने आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिझवान पिरजादे, के. वाय. देशमुख यांच्यासह इएसडीएसच्या चेतन चांदुळे, अविनाश भांडारकर, राजेश बागुल सह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे विश्वस्त सुभाष देशमुख, विजया देशमुख यांच्या प्रेरणा या कार्यक्रमामागे होती.

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”