नाशिक: बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे गुरूवारपासून १२ जानेवारीपर्यंत संवर्धनासाठी बंद राहणार आहे. या विषयी बऱ्याच भाविकांना पूर्वकल्पना नसल्याने अनेकांना बंद दाराचे दर्शन घेत माघारी परतावे लागले. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री त्र्यंबकराज देवस्थान प्राचीन मंदिर आहे. वातावरणातील बदल, पूजेत वापरण्यात येणारे पंचामृत आदी कारणांमुळे मूर्तीची झीज तसेच गर्भगृहातील काही भागात झीज जाणवत आहे. संभाव्य हानी रोखण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने देवस्थानच्या सहकार्याने गाभाऱ्यासह मूर्ती संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाविकांना अडचणी जाणवू नये यासाठी मंदिर पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. १२ जानेवारीपर्यंत मंदिर बंद राहणार आहे.

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती

हेही वाचा >>> नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांसह पर्यटकांच्या संख्येतही वाढ

या काळात देवस्थान परिसरात त्रिकाल पूजा, अभिषेक आदी विधी नियमीतपणे सुरु राहणार आहेत. संवर्धन कामकाजाचा पहिला दिवस असल्याने माध्यान्ह पूजा तसेच प्रदोष पूजा नियोजित वेळेपेक्षा अंशत: उशीराने सुरू झाली. दरम्यान, मूर्ती संवर्धननंतर पूजेत पंचामृत, दही अथवा दुधाचा वापर होणार नाही. जल अभिषेकाला प्राधान्य देण्यात येईल. आधीच देवस्थानच्या वतीने दहीचा वापर बंद करण्यात आला आहे. संवर्धनानंतर पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल, असे विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी सांगितले.