धुळे – एक कोटी, १४ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविल्याने महापालिकेच्या वसुली विभागातर्फे बुधवारी बँक ऑफ महाराष्ट्राची इमारत गोठविण्यात आली. आयुक्त देविदास टेकाळे यांनी कर वसुलीसाठी स्वतंत्र पथक नेमले असून या पथकामार्फत ठिकठिकाणी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरातील गल्ली नंबर चारमध्ये राजवाडे संशोधन मंडळाची वास्तु आहे. या वास्तुमध्येच बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा उघडण्यात आली आहे. राजवाडे संशोधन मंडळाने बँकेला भाडेतत्वावर इमारत देतांना करार केला आहे.

हेही वाचा >>> नाशिक : शेतकऱ्यांसमोर पुन्हा उभे राहण्याचे आव्हान, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरु

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
RBI restrictions on Shirpur Cooperative Bank
रिझर्व्ह बँकेचे शिरपूर सहकारी बँकेवर निर्बंध
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

महापालिकेतर्फे आकारला जाणारा कर बँकेने स्वतः भरावा, असे या करारात नमूद केले आहे. मात्र २०११ पासून मार्च २०२३ पर्यंत बँक व्यवस्थापनाने मालमत्ता करापोटी एक कोटी, १४ लाख, ३६ हजार ६९२ रुपये थकविले आहेत. दंडासह आकारण्यात आलेली ही रक्कम वसुलीसाठी महापालिकेने बँकेला अनेकदा नोटीस दिली. मार्च २०२३ मध्ये जिल्हा न्यायविधीच्या माध्यमातून तडजोडीसाठीची नोटीसही देण्यात आली. या तडजोडीलाही बँकेने नकार दिल्याने वसुली विभागाने बँकेला पुन्हा नोटीस देवून कारवाईचा इशारा दिला होता. तथापि, बँक व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने अखेर बुधवारी सकाळी महापालिकेचे वसुली अधिकारी शिरीष जाधव, लिपीक मधुकर वडनेरे यांच्या पथकाने बँकेच्या शाखेला गोठविण्याची कारवाई केली.