धुळे : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझादनगर, नेर आणि कुसुंबा या गावी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान यांनी संचलन केले. अप्पर अधीक्षक किशोर काळे, धुळे ग्रामीण आणि साक्री विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद पाटील, धुळे तालुका ठाण्याचे सर्व दुय्यम अधिकारी, अमलदार आणि गृहरक्षक यांनी या संचलनाचे नियोजन केले.

हेही वाचा : उद्यापासून पुन्हा कांदा कोंडी? केंद्राच्या धोरणास विरोध, लिलावापासून दूर राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय

बंदोबस्तास असलेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित जवानांना आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, धुळे शहर उपविभागातर्फेही आझाद नगर पोलीस ठाण्यापासून संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, धुळे शहर उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे आणि राखीव दलाचे जवान यावेळी उपस्थित होते.

Story img Loader