नांदगाव : नांदगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी १० प्रभागांची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेसंदर्भात सूचना आणि हरकतीसाठी १७ मार्चपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये बौद्ध नगर, मालेगाव रोड, ढासे मळा,  लक्ष्मीनगर, दत्तनगर, खानदेशी वाडा, गुप्ता चाळ, कवडे नगर, महाजन वाडा, जैन धर्म शाळा, न्यू इंग्लिश स्कूल या भागांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये साकोरा रोड, रेल्वे स्टेशन रोड, शनी चौक, आंबेडकर चौक, मस्तानी अम्मा दर्गा, खराटे चाळ, कामगार जुनी चाळ, लोणार चाळ, जालना जीन, एसटी स्टॅण्ड, मोकळ नगर, शांती बाग कॉलनी, प्रभाग क्रमांक तीनमध्ये आनंद नगर, हमालवाडा, कैलास नगर औरंगाबाद रोड, नवीन वस्ती, न्यायालय, नवीन तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, प्रभाग क्रमांक चारमध्ये बालाजी चौक, साने गुरुजी नगर, महावीर मार्ग, महात्मा गांधी चौक, बेलदार गल्ली, कुंभार गल्ली, श्रीकृष्ण नगर, संभाजी नगर, जंगम गल्ली, न्हावी वाडा, बालाजी चौक, कासार गल्ली, जैन मंदिर, प्रभाग क्रमांक पाचमध्ये कासार गल्ली, सराफ बाजार, ओसवाल भवन, दहेगाव नाका, होलार वाडा, तेली गल्ली, थत्ते वाडा, कोर्ट गल्ली, जामा मस्जिद, भेंडीबाजार, लक्ष्मी थिएटर, भोंगळे रोड, अहिल्यादेवी चौक यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवाजीनगर, गुरुकृपा नगर, आढाव गल्ली, गणेश नगर, नरेंद्र स्वामी नगर, एकनाथ नगर, कालिका मंदिर, देवकर गल्ली, एकविरा देवी मंदिर, प्रभाग क्रमांक सातमध्ये पाटील गल्ली, द्वारका नगर, देवी गल्ली, गल्ली नंबर तीन,  होलारवाडा, थत्ते वाडा, प्रभाग क्रमांक आठमध्ये गुलजार वाडी, पॉवर हाऊस, गुजारवाडी, चांडक प्लॉट, विजय ऑइल मिल, करीम चाळ, शिंदे मळा, प्रभाग क्रमांक नऊमध्ये गांधी नगर, नेहरू नगर, आनंद नगर, नवीन वस्ती, पाण्याच्या टाकीजवळील भाग, प्रभाग क्रमांक १० मध्ये एस टी कॉलनी, विवेकानंद नगर, मार्केट कमिटी, जय भोले नगर, गांधीनगरचा काही भाग यांचा समावेश आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Draft ward structure nandgaon municipal council announced ysh
First published on: 15-03-2022 at 01:58 IST