धुळे – शेतात औषधाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने धुळे तालुक्यातील विंचुर गावातील तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सचिन वाघ (३१, रा. विंचुर, धुळे) हा तरुण शेतकरी  शेतात किटकनाशक औषधाची फवारणी करत होता. यावेळी त्याच्या तोंडात व नाकात विषारी औषध गेल्याने त्याला उलटीचा त्रास होऊ लागला. ग्रामस्थांनी सचिन यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र  त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी शेतात औषध फवारणी करताना डोळ्यांवर चष्मा, नाकतोंड व्यवस्थित कापडाने झाकून काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून वारंवार करण्यात येत असते.

nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
seven houses were burn in fire due to explosion of gas cylinder
जामनेर तालुक्यातील आगीत सात घरे भस्मसात, गॅस सिलिंडरच्या स्फोटाने गाव हादरलेन
heart attack in the swimming pool
धक्कादायक! ‘स्विमिंग पूल’मध्येच हृदयविकाराचा झटका
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी