धुळे – वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना अ‍ॅलोपॅथी औषधांचा साठा बाळगून अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय केल्याच्या आरोपाखाली जिल्ह्यात सात बनावट डॉक्टरांविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्तीक सहभागातून ही कारवाई झाली.

असी बिश्वास (५०, वार्सा,साक्री), संभाजी सोनवणे (७०, उमरे, साक्री), योगेश पाटील (२४) आणि राकेश पाटील (२८) दोघे राहणार गोपाल नगर, पिंपळनेर, विजय बडगुजर (५२, बन्सीलाल नगर, शिरपूर), समर बिश्वास (४७, सोनगीर, धुळे) आणि धिरज अहिरे (३३, जुने भामपूर, शिरपूर) अशी बनावट डॉक्टरांची नावे आहेत. या सर्व सात जणांविरुद्ध संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Violent Incident civil hospital thane, Patient s Relatives Attack Staff, civil Hospital Thane, Patient died at civil Hospital Thane, thane civil hospital staff and doctors protest, thane civil hospital, thane news, thane civil hospital news, thane news,
ठाणे जिल्हा रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्यांना मारहाण; घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
Over 100 Private Hospitals in Pune Operate Without Renewed Licenses
धक्कादायक! पुण्यात शंभरहून अधिक रुग्णालये विनापरवाना

यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्‍यांची माहिती घेतली. माहितीची खात्री झाल्यानंतर सामान्यांच्या जीवाशी खेळणार्‍या डॉक्टरांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा : धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दणका, कामचुकार सात अंमलदार निलंबित

या पार्श्वभूमीवर चार जानेवारी रोजी विविध गावांमध्ये छापा घालून पोलिसांनी अ‍ॅलोपॅथी औषधी साठा, इंजेक्शन, सलाईन, गोळ्या तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले. जिल्ह्यातील बनावट डॉक्टरांविषयी कोणाला माहिती असल्यास पोलिसांना द्यावी, माहिती देणार्‍यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.