Premium

कंस मामाला लाजवेल असा निर्दयीपणा, धुळ्यात पिंपात बुडवून चार वर्षाच्या बालकाला मारले

मोठ्याने रडत असलेल्या चार वर्षाच्या बालकाला त्याच्या मामाने पाण्याने भरलेल्या पिंपात बुडवून मारण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

four-year-old boy was killed by dipping water tank in dhule
मंगळवारी दुपारी शहरातील फिरदोस नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : शहरातील फिरदोन नगरात कंस मामाला लाजवेल असा निर्दयपीणा एका मामाने दाखवला आहे. मोठ्याने रडत असलेल्या चार वर्षाच्या बालकाला त्याच्या मामाने पाण्याने भरलेल्या पिंपात बुडवून मारण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. मंगळवारी दुपारी शहरातील फिरदोस नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी धुळ्यातील फिरदोस नगरमधील मरियमबी हुसेन (२८) यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मरियम या त्यांच्या आई-वडिलांकडे गेलेल्या असताना त्यांचा चार वर्षांचा मुलगा मोहम्मद हा घरात खेळत होता. खेळतांना तो मोठ्याने रडू लागल्याने त्याचा मामा नुरुल अमीन नईम अहमद (२२) याने मोहम्मद यास पाण्याने भरलेल्या पिंपात टाकले. यामुळे मोहम्मदचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

आणखी वाचा-मोडी लिपीमुळे आव्हान, नाशिकमध्ये ३० हजार मराठा-कुणबी नोंदी पडताळणीचे संकट

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला. मोहम्मद हा रडू लागल्याने नुरुल अहमदचे डोके दुखू लागले होते. यामुळे त्याने संतापात मोहम्मद यास पाण्यात टाकले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे फिरदोस नगर परिसरात मृत बालकाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत असून संशयित नुरुलबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Four year old boy was killed by dipping water tank in dhule mrj

First published on: 06-12-2023 at 15:11 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा