‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊत-तुंगार रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार असल्याने येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मंगळवारी तिचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कविता ही मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे.

कविता रिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन या क्रीडा प्रकारात भाग घेणार आहे. सध्या ती मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत आहे.

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
ugc new decision direct admission to phd after graduation
आता पदवीनंतर पीएच.डी.ला मिळणार थेट प्रवेश! काय आहे युजीसीचा नवा निर्णय? युजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेशकुमार यांची माहिती 
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा

१८ मे रोजी ती ऑलिम्पिकच्या तयारीसाठी बंगळूरू येथे जाणार असल्याने तिला विद्यापीठाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी विद्यापीठातर्फे पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या.

क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुक्त विद्यापीठाने दिलेली संधी आपल्या आयुष्यात जमेची बाजू असल्याचे तिने यावेळी सांगितले. या क्षेत्रात कामगिरी करताना सराव हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने या विद्यापीठाचा मोठा फायदा होत असल्याचे कविताने नमूद केले. कविताप्रमाणेच रिशु सिंग, गौरी राजोळे, शितल भगत, सुनील खंदारे हे विद्यार्थी देखील मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण घेत असून त्यांनी आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धात यश मिळविलेले आहे. यावेळी विद्यापीठाचे वित्त अधिकारी पंडित गवळी, प्रभारी जनसंपर्क अधिकारी व ‘सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत’ या धडय़ाचे लेखक संतोष साबळे आदी उपस्थित होते.