गोदावरी नदीच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून महापालिकेने पात्राची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत रामकुंड ते संत गाडगेबाबा पुलापर्यंत पात्रातील गाळ काढण्यात येणार आहे.

सध्या गोदापात्रातील प्रवाह बराच कमी झाला आहे. पाण्याची पातळी खालावल्याने पात्राच्या स्वच्छतेचे काम हाती घेणे शक्य झाले. मंगळवारी गोदावरी प्रगट दिन आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने आदल्या दिवशी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. गोदावरी प्रदूषणाचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. प्रवाह कमी झाल्यामुळे कुंडांमध्ये पाणी साठते. त्यातील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. देशभरातील भाविक धार्मिक विधी व गोदावरीच्या पात्रात स्नान करण्यासाठी रामकुंड परिसरात येतात. त्यांची गैरसोय होऊ नये व पाण्याला वास येऊ नये म्हणून शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम हाती घेतली गेली. जेसीबी, ट्रॅक्टर आणि १५ ते २० कामगारांच्या सहभागाने गोदा पात्रातील कचरा काढला जात आहे. आठ दिवस या मोहिमेसाठी गृहीत धरले असले, तरी आवश्यकतेनुसार मोहिमेचा कालावधी वाढविला जाऊ शकतो, असे पंचवटी विभागाचे उपअभियंता (बांधकाम) प्रकाश निकम यांनी म्हटले आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

हेही वाचा – नाशिक : दिवाळीत हवेत गोळीबार करणाऱ्यास अटक

स्वच्छतेमुळे गोदा पात्राची खोली वाढणार आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाकडून विविध माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यात सामाजिक संस्थांचे सहकार्य मिळत आहे. शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी गोदागीत म्हटले जाते. पात्रात निर्माल्य टाकले जाऊ नये म्हणून निर्माल्य कलश ठेवले गेले. गोदापात्रात वाहने वा कपडे धुण्यास प्रतिबंध आहे. असे उपाय योजले गेले असले तरी गोदावरीची प्रदुषणाच्या जोखडातून सुटका झालेली नाही. निर्माल्य कलश भरल्यानंतर त्वरीत ते रिकामे करणे आवश्यक असताना गाडगे महाराज पुलावर असलेले निर्माल्य कलश भरून कचरा बाहेर पडत असतो, तरी ते रिकामे केले जात नसल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे निर्माल्य कलश ठेवण्याचा हेतू सफल होत नाही.

हेही वाचा – नाशिक : आता युद्धाधारित कामगिरीवर प्रकाश, तोफखाना संग्रहालयाच्या अंतरंगात बदल

मोहिमेत पात्रातून निघणारा कचरा गोदावरीची स्थिती अधोरेखीत करीत आहे. मोहिमेंतर्गत रामकुंड आणि संत गाडगेबाबा पूल दरम्यानचे पात्र काही कालावधीसाठी स्वच्छ होईल. तथापि, पुन्हा त्यात कचरा येणार नाही, यादृष्टीने काळजी घेण्याची आवश्यकता भाविक मांडतात. गोदापात्रात स्नानासाठी तसेच धार्मिक विधींसाठी दररोज हजारोच्या संख्येने विविध राज्यातून भाविक येत असतात. त्यांच्यासमोर गोदावरीचे गलिच्छ चित्र जाऊ नये म्हणून प्रयत्न होणे आवश्यक आहे. परराज्यातील भाविकांना माहितीसाठी रामकुंड परिसरात सूचना फलक, तसेच सचित्र मार्ग फलक लावण्याचीही गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.