वेगवेगळय़ा ७५ कमळांसाठी स्वतंत्र कुंडांची रचना

नाशिक – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त वेगवेगळे उपक्रम प्रशासकीय पातळीवर राबविण्यात येत असताना आता पर्यावरणप्रेमींनीही पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. पर्यावरण संवर्धनाची आवड सर्वसामान्यांमध्ये रुजावी यासाठी आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ७५ प्रकारच्या कमळांची लागवड करण्यात येणार आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद

आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत प्रशासकीय पातळीवर वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा घेण्यात येत आहेत. वृक्ष लागवडीसह पर्यावरणविषयक वेगवेगळय़ा उपक्रमांत सातत्याने आघाडीवर असणाऱ्या येथील आपलं पर्यावरण या संस्थेने या कार्यक्रमातही सहभाग घेतला आहे. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत आपली वसुंधरा सुंदर या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपले राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी ७५ कुंड तयार करण्यात येतील. त्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना हवी त्याप्रमाणे दलदल तयार करण्यात येईल. त्यामध्ये कमळाची लागवड करून वेळच्या वेळी त्याची निगा राखण्यात येणार आहे. वनराईमध्ये या उपक्रमाला सुरुवात करण्यात येईल. विशेष म्हणजे वनराईचे पठार संपूर्ण दगडी स्वरूपाचे आहे.

पूर्वी कमळे बऱ्याच ठिकाणी नैसर्गिकरीत्या फुललेली दिसायची. पूर्वी नाशिक शहर फुलांनी कायम बहरलेले असायचे. त्यामुळे नगरीला गुलशनाबाद म्हणूनही ओळखले जात असे. कालांतराने ती ओळख मागे पडत गेली. शहरातील िशगाडा तलावात अनेक कमळपुष्पे फुललेली दिसून यायची. बांधकाम वाढत गेले आणि हा तलावही गायब झाला. कमळांचे नैसर्गिक स्थान दिवसेंदिवस नष्ट होत चालले आहे. असे असले तरी अजूनही काही ठिकाणी नैसर्गिकरीत्या मोठय़ा प्रमाणावर कमळपुष्पे फुललेली दिसून येतात. परंतु त्या ठिकाणच्या नागरिकांना त्यांचे विशेष औत्सुक्य नसल्याने कमळप्रेमींपासून ते दूरच राहतात. मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील नदीतील दलदलीच्या भागात आजही अनेक सफेद कमळपुष्पे फुललेली दिसतात. परंतु पिंपळगावच्या नागरिकांना त्यांचे कोणतेही अप्रूप वाटत नाही. कमळ शेतीमधून कमळांविषयी स्थानिकांचे प्रबोधन व्हावे, नैसर्गिकरीत्या ती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जपली जावेत, हा संदेश आपलं पर्यावरण संस्था आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून देऊ इच्छित आहे. कुंडांमध्ये कमळपुष्पे लावण्यात येणार असल्याने संस्थेच्या वतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. एका कुंडासाठी येणारा खर्च काही लोक देण्यासाठी तयार आहेत. त्या कुंडावर त्या संस्थेचे किंवा त्या व्यक्तीचे नाव लिहिले जाईल. इच्छुकांनी यासाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रबोधन व्हावे म्हणून..

कमळ शेतीमधून कमळांविषयी स्थानिकांचे प्रबोधन व्हावे, नैसर्गिकरीत्या ती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जपली जावेत, हा संदेश आपलं पर्यावरण संस्था आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून देऊ इच्छित आहे. कुंडांमध्ये कमळपुष्पे लावण्यात येणार असल्याने संस्थेच्या वतीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे.