मालेगाव महापालिका निवडणूक

गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत ज्या पक्षाला शोधूनही उमेदवार मिळत नव्हते, त्या भाजपला कधी नव्हे एवढे ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र या वेळी निर्माण झाले. भाजपच्या बोलबाल्यामुळे विरोधक असलेली शिवसेना काहीशी ‘बॅक फूटवर’ गेल्यासारखी स्थिती दिसत होती; परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत कलहामुळे काही फासे उलटे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा गृहकलह शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे युवानेते अद्वय हिरे व पक्षाचे महानगरप्रमुख सुनील गायकवाड या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. पक्षनिरीक्षक व कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी मालेगावात येऊन हे मतभेद मिटविण्याचे प्रयत्न केले तरी त्यात फार यश आले नसल्याचे सांगितले जाते. वर्चस्ववाद व आपल्याच समर्थकांना उमेदवारी मिळावी या कारणावरून या दोघांमध्ये हे मतभेद निर्माण झाल्याची वदंता आहे.  विधानसभा ते बाजार समिती अशा विविध निवडणुकांमध्ये आजवर दादा भुसे यांना विरोधकांमधील वादाचा आयता फायदा मिळत आला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही यशाला गवसणी घालणे त्यांना त्यामुळे शक्य होत आले आहे. याही वेळी त्यांना अशीच काहीशी संधी चालून आली असल्याचा एकूणच रागरंग दिसतो.

मोदी लाटेनंतर भाजपची पश्चिम भागावर पकड

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या मोदी लाटेनंतर या परिस्थितीत बदल सुरू झाला. भाजपमध्ये मोठय़ा प्रमाणावर ‘इन कमिंग’ सुरू झाले. जिल्ह्य़ाच्या राजकारणातील एक बडे राजकीय हिरे घराण्यातील वारसदार आमदार अपूर्व व अद्वय हिरे हे भाजपमध्ये दाखल झाले.   अद्वय हिरे यांनी कट्टर विरोधक दादा भुसे यांना आव्हान देणे सुरू केले. इतकेच नव्हे, तर तालुका सेनामुक्त करण्याची भाषा त्यांनी सुरू केली. पुढे चार नगरसेवकांचे बळ असलेली सुनील गायकवाड यांची मालेगाव विकास आघाडी भाजपमध्ये सामील झाली. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागावर भाजपची चांगल्यापैकी पकड असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे याआधी उमेदवारी घेण्यासाठी लोकांकडे मिनतवाऱ्या कराव्या लागणाऱ्या भाजपकडे या वेळी उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची तोबा गर्दी होऊ लागली.

मतभेद पराकोटीला

एका प्रभागात भाजपचे माजी शहराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पत्नी रेखा चौधरी यांना पक्षाने आधी उमेदवारी जाहीर केली होती; मात्र ऐन वेळी त्यांचा एबी फॉर्म गहाळ करीत त्या ठिकाणी वैशाली जाधव या दुसऱ्या उमेदवाराला भाजपचा एबी फॉर्म दिला जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे गायकवाड गटाने चौधरी याच भाजपच्या उमेदवार असल्याचा दावा करीत जाधव यांच्या उमेदवारीला हरकत घेतली आणि त्यांचा अर्ज फेटाळून लावण्याची मागणी उचलून धरली. अंतिमत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावत जाधव यांच्या भाजप उमेदवारीचा दावा कायम ठेवण्याचा निकाल दिला. आता चौधरी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली तरी या प्रकारावरून भाजपमधील गृहकलह कोणत्या स्तरावर गेला आहे व निवडणुकीत त्याचे काय परिणाम संभवतात, याचा सहज अंदाज येतो.

१५ वर्षांत भाजपचा एकच नगरसेवक

मालेगाव महापालिकेच्या ८४ जागांपैकी वीस जागांचा अंतर्भाव असलेल्या शहराच्या हिंदूबहुल पश्चिम भागात भाजप व सेना या परस्परविरोधी पक्षांचे प्राबल्य आहे. तर ६४ जागा असलेल्या मुस्लीमबहुल पूर्व भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल, एमआयएम या पक्षांचे वर्चस्व आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत तीन निवडणुका झाल्या. त्यातील २००२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी सेना-भाजपची युती होती. तेव्हा शिवसेनेला आठ तर भाजपला केवळ एक जागा मिळाली. गेल्या पंधरा वर्षांत भाजपला महापालिकेत केवळ एकच नगरसेवक पाठवता आला असताना सेनेने उल्लेखनीय म्हणता येईल, असे यश वेळोवेळी संपादन केल्याचे दिसून येते. २००७ मध्ये सात, तर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अकरा जागा पटकावत महापालिका राजकारणात स्वत:चा दबदबा निर्माण करण्यात सेना यशस्वी झाली.  मालेगावच्या राजकारणात दादा भुसे यांचा उदय झाल्यावर सेनेचे वर्चस्व वाढू लागले. तर दुसऱ्या बाजूला भाजपची पीछेहाट सुरू राहिली. त्याचा परिपाक म्हणून त्यानंतर झालेल्या पालिकेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये सेनेने भाजपशी युती करण्याचेही नाकारले.