इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळा परिसरातील विहिरीत २३ वर्षाची विवाहिता आणि तिच्या तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. प्रियंका दराणे (२३) आणि वेदश्री दराणे (तीन) असे या माय-लेकीचे नाव आहे. दोघीही जवळच असणाऱ्या शेणवड खुर्द येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा >>> नाशिक: वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट, प्रवासी सुखरूप

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother and her daughter dead body found in well near mundhegaon zws
First published on: 22-05-2024 at 15:28 IST