scorecardresearch

‘महावितरण’च्या तिजोरीत ३२ लाखांची भर

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित आणि न्यायालयात प्रलंबित असलेली वीज चोरीची प्रकरणी ‘महावितरण’च्या तिजोरीत ३२ लाख ८७ हजार रुपयांची भर पडली आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीत महावितरणचे अभियंता व कर्मचारी.

लोक अदालतीत एकूण ३३७ ग्राहकांचा प्रतिसाद; तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा

नाशिक : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित आणि न्यायालयात प्रलंबित असलेली वीज चोरीची प्रकरणी ‘महावितरण’च्या तिजोरीत ३२ लाख ८७ हजार रुपयांची भर पडली आहे. नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर मंडळातील एकूण ३३७ ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. तडजोडीच्या माध्यमातून करून या सर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.  

नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या लोकअदालतीत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित आणि न्यायालयात प्रलंबित असलेली वीज चोरीची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या प्रकरणी नाशिक मंडळातील ६७ ग्राहकांनी आठ लाख २१ हजार रुपयांचा भरणा केला. तर मालेगाव मंडळातील ५३ ग्राहकांनी तीन लाख ६० हजार रुपये, अहमदनगर मंडळातील ४३ ग्राहकांनी एक लाख ४० हजार रुपये असा एकूण १३ लाख २१ हजार रुपयांचा भरणा केला.

वीजचोरी संबंधित दाव्यांमध्ये मालेगाव मंडळामध्ये एकूण २३ दाव्यामध्ये तडजोड झाली. यात एक लाख ४५ हजार तसेच अहमदनगर मंडळामध्ये एकूण १५१ दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी १८ लाख २१ हजार रुपयांचा भरणा केला. नाशिक परिमंडळात एकूण १७४ वीजचोरी संबंधित दाव्यामध्ये ग्राहकांनी तडजोड करीत १९ लाख ६६ हजार रुपये भरले. नाशिक परिमंडळात ३३७ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली. या प्रकरणी महावितरणला ३२ लाख ८७ हजार रुपयांचा महसूल मिळाला. 

‘महावितरण’च्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, रमेश सानप आणि सुनील काकडे, वरिष्ठ व्यवस्थापक दिनकर मंडलिक, रामेश्वर कुमावत वित्त आणि लेखा विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msedcl coffers money light bill ysh

ताज्या बातम्या