नाशिक : इंदिरानगर भागात दुकानाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून अल्प दरात पावभाजी विक्रीचा प्रयत्न दुकानदाराला अडचणीत आणणारा ठरला. दुकानासमोर ग्राहकांची तोबा गर्दी जमली. जिथे जागा मिळेल, तिथे ग्राहकांनी आपली वाहने उभी करुन रांगा लावल्या. यामुळे अन्य वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे पोलिसांनी संबंधित पावभाजी दुकानदाराविरुध्द वाहतुकीत अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत भररस्त्यात हातगाडी लावून फळ विक्री करणाऱ्या दोघा विक्रेत्यांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतुकीची समस्या बिकट झाली असताना अशा प्रकारे गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

इंदिरानगर येथील घटनेबाबत पोलीस शिपाई गणेश राहिंज यांनी तक्रार दिली. मिलिंद कुलकर्णी (मोदकेश्वर मंदिराजवळ, इंदिरानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पावभाजी दुकानदाराचे नाव आहे. कुलकर्णी यांनी रथचक्र चौकात हॉटेल पावभाजी पांडा नावाचे दुकान सुरू केले. या दुकानाच्या उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर अल्प दरात पावभाजीची समाज माध्यमात जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली. ग्राहकांच्या वाहनांसाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे वाहने उभी करण्यात आली. पावभाजी खरेदीसाठी गोंधळ उडाला. हॉटेलसमोर २०० ते ३०० लोकांची गर्दी जमवून आणि वाहने बेशिस्तपणे उभी करून रस्त्यावरील वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा आणल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या गर्दीतून पादचाऱ्यांसह अन्य वाहनधारकांना मार्गस्थ होणे त्रासदायक ठरले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shocking twist in child abduction case of Chikhli cousin murder 10 years old boy
भयंकर! आधी गळा दाबला, मग पोत्यात कोंबले आणि उकीरड्यात पुरले! आते भावानेच…
Kalyan, Dombivli, army job fraud, Manpada police, fake appointment letters, youth scam, police investigation, kalyan news, thane news,
सैन्य दलात भरतीचे आमिष दाखवून डोंबिवली, कल्याणममधील भामट्यांकडून ४६ लाखाची फसवणूक
Pune, Burglary, jewelry, hidden,
पुणे : घरफोडी करून दागिने लपवले मेट्रो स्थानकाच्या जिन्याजवळ
Nashik, liquor, smugglers, excise vehicle,
नाशिक : उत्पादन शुल्कच्या वाहनास धडक देणारे दोन दारू तस्कर ताब्यात
extortion case
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; खंडणी प्रकरण
Irregularities in government onion purchase two officers of Nafed arrested
सरकारी कांदा खरेदीत अनियमितता, नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी
pune, pune Forest Department, PETA Rescue Parrots, Rescue Parrots from Aundh, PETA, Legal Action Taken, parrot news,
डांबून ठेवलेल्या तीन पोपटांची सुटका ‘पेटा इंडिया’, वन विभाग यांची संयुक्त कारवाई
Thane Citizens, Thane Citizens Protest Aggressive Bike Towing, Police Seek Rule Adherence, thane news,
टोईंग कारवाईच्या त्रासामुळे ठाणेकर हैराण ठाण्यातील सुजान नागरिकांचे टोईंगविरोधात आंदोलन, जागोजागी जनजागृती

हेही वाचा… नाशिक : शेतकऱ्यांसाठी ठाकरे गटही मैदानात; बैलगाड्या, ट्रॅक्टरद्वारे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

नाशिकरोड भागातही वाहतूक कोंडीला कारक ठरलेल्या दोन फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. आरिफ बागवान आणि इद्रीस बागवान अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या फळ विक्रेत्यांची नावे आहेत. नाशिकरोड रेल्वे स्थानक भागातील अतिशय वर्दळीच्या हातोडा रिक्षा थांबा भागात दोघांनी फळाची हातगाडी उभी केली होती. संबंधितांच्या हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळे येत होते. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशी हातगाडी उभी करणे आणि स्वत:च्या जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्या प्रकरणी दोघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.