प्रशासनाकडून राजकीय नेत्यांची काळजी

नियमबाह्य़ अनधिकृतपणे वापरात असलेल्या शहरातील १६६ मंगल कार्यालय आणि लॉन्सच्या मालकांना महापालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस बजावली आहे. परवानगी न घेता बांधकाम आणि वापर होत असल्याच्या मुद्दय़ावरून ही कारवाई सुरू करण्यात आली. बहुतांश मंगल कार्यालये आणि लॉन्स हे नगरसेवक, राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मालकीची आहेत. प्रशासनाने यादी जाहीर करताना सत्ताधारी भाजपची मंडळी दुखावणार नाहीत याची दक्षता घेतली, तर विरोधी पक्षांशी संबंधित मंगल कार्यालये, लॉन्समालकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Megha Engineering, Eight tenders,
एमएसआरडीसीच्या दोन प्रकल्पांसाठी मेघा इंजिनिअरिंगच्या आठ निविदा, निवडणूक रोखे खरेदीतील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी
Why Buy Most BH Series Vehicle Number in Pune Who can get this number
विश्लेषण : सर्वाधिक BH मालिका वाहन क्रमांकाची खरेदी पुण्यात का? हा क्रमांक कुणाला मिळू शकतो?
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर

शहराची वाढती लोकसंख्येसाठी मंगल कार्य, तत्सम उपक्रमांसाठी ठिकाणे मर्यादित आहेत. हे लक्षात घेऊन मागील काही वर्षांत या व्यवसायात राजकीय पक्षांशी संबंधित मंडळींनी अधिक्याने प्रवेश केला आहे. ज्या घटकांची शहर परिसरात आधीपासून जागा होती, त्यांनी देखील मंगल कार्यालये तसेच लॉन्स सुरू करण्याचा सपाटा लावला. हे व्यवसाय सुरू करताना आवश्यक परवानगी, वाहनतळासाठी पुरेशी जागा अशा तत्सम बाबी पूर्ण करणे अपेक्षित होते. तथापि, आज अनेक मंगल कार्यालय, लॉन्स पाहिल्यावर वाहनतळासाठी कोणी जागा ठेवली नसल्याचे दिसून येते. कार्यालय, लॉन्सचालकांकडून रस्त्यावरील जागेचा वाहनतळ म्हणून वापर केला जातो.

परिणामी, शहरातील अनेक भाग लग्नतिथीच्या दिवशी वाहतूक कोंडीत सापडत असल्याचे चित्र आहे. काही मंगल कार्यालये आणि लॉन्सने वाहनतळाच्या जागा लुप्त केल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी वाढीव बांधकामे केली गेली. या मुद्दय़ावर मध्यंतरी गदारोळ झाल्यानंतर पालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील मंगल कार्यालये आणि लॉन्सचे सर्वेक्षण सुरू केले. त्या अंतर्गत बांधकाम परवानगी आणि तत्सम बाबींची तपासणी करण्यात आल्याचे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी नियमबाह्य़ अनधिकृत वापर आढळून आला, अशा सर्व मंगल कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांना आपले म्हणणे मांडण्यास आणि कागदपत्रे सादर करण्यास मुदत देण्यात आली. या घडामोडींमुळे  मंगल कार्यालय, लॉन्स चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. नियमबाह्य़ अनधिकृत वापरात असलेल्या मंगल कार्यालय आणि लॉन्सच्या यादीत सातपूर विभागात सहा, नाशिक पश्चिम विभागात १५, सिडको १९, पंचवटी विभागात सर्वाधिक म्हणजे ६४, नाशिक पूर्व १४, नाशिक (गावठाण परिसर) नऊ, नवीन नाशिक (पाथर्डी गाव आणि सिडकोचा काही भाग) १४, नाशिक रोड (विहितगाव, देवळाली, दसक, देवळाली गावठाण) या भागातील २३ मंगल कार्यालये आणि लॉन्सचा समावेश असल्याची माहिती नगररचना विभागाने दिली. काही मंगल कार्यालये आणि लॉन्स बांधकामाची परवानगी न घेता अनधिकृत वापर करीत असल्याचे नगररचना विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नोटीस बजावतानाही महापालिकेकडून राजकारण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. काही मंगल कार्यालय, लॉन्सच्या मालकांची नावे यादी सोबत देताना भाजप तसेच सत्ताधाऱ्यांशी निगडित पदाधिकाऱ्यांची मंगल कार्यालये किंवा लॉन्सच्या मालकांची नावे देणे टाळण्यात आले आहे.

लवकरच कारवाई

नियमबाह्य़पणे मंगल कार्यालये, लॉन्सचा अनधिकृतपणे वापर करणाऱ्या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्यांच्याकडे महापालिकेच्या बांधकाम परवानगी किंवा तत्सम कागदपत्रे असतील, त्यांच्याकडून आपली बाजू कागदपत्रांसह मांडली जाईल. परंतु, ज्यांच्याकडे परवानग्या नाहीत, त्यांची यादी लवकरच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे सोपविली जाईल.

नगररचना विभाग, महापालिका

स्थायी समितीसमोर माहिती सादर

मंगल कार्यालये, लॉन्सबाहेर रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याने अनेक भागात वाहतूक कोंडी होत असते. महापौरांनी या संदर्भात सर्वेक्षणाचे निर्देश दिले होते. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला आला. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी या संदर्भात विचारणा केली असता प्रशासनाकडून आतापर्यंत झालेल्या कारवाईचा अहवाल मांडण्यात आला. आतापर्यंत अनधिकृत वापर करणाऱ्या एकूण १६६ मंगल कार्यालये, लॉन्सना नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांची बाजू ऐकून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.