नाशिक – न्हाणीघरात पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. चुंचाळे शिवारात ही घटना घडली. अल्तमश अन्सारी (फरगळे दवाखान्यासमोर, संजीवनगर) असे मुलीचे नाव आहे. अन्सारी कुटुंबीय सोमवारी सायंकाळी घरकामात गुंतले असताना हा अपघात घडला.

हेही वाचा – बस-दुचाकी अपघातात आजोबांसह नातीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन

हेही वाचा – रावेर मतदारसंघात शरद पवार गट उमेदवार बदलणार ? संतोष चौधरी यांना अपेक्षा

अल्तमश घरात खेळत असताना अचानक न्हाणीघरात गेली. अर्धवट भरलेल्या बादलीतील पाण्याशी खेळत असताना ती बादलीत पडली. बराच वेळ उलटूनही तिचा आवाज न आल्याने पालकांनी शोध घेतला असता ती बादलीत खाली डोके वर पाय अशा अवस्थेत आढळली. वडील सफीउल्ला अन्सारी यांनी तातडीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.