नाशिक – शिवजयंतीनिमित्त रविवारी शहरातील वाकडी बारव आणि नाशिकरोड येथून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत कर्कश ध्वनियंत्रणा (आवाजाच्या भिंती) आणि गुलालाचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उत्सवानिमित्त शहरात कुठेही फलक उभारताना त्यावरील मजकूर आणि छायाचित्रांविषयी मंडळांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. स्मार्ट सिटी योजनेची कामे वेळेत पूर्ण करून मिरवणूक मार्गातील अडसर दूर करण्याचे मनपाने मान्य केले.

हेही वाचा >>> गर्दीमुळे मुख्यमंत्री तर, कामांच्या मंजुरीने आमदार कांदे सुखावले

nashik dindori lok sabha marathi news
नाशिक, दिंडोरीत पहिल्या दिवशी तीन अर्ज दाखल
nashik municipal corporation schools marathi news, 1000 rupees saree nashik teachers marathi news
नाशिक मनपा शाळांमध्ये पोषाख संहितेची तयारी, शिक्षिकांकडून प्रतिसाडी एक हजार रुपयांचे संकलन
Illegal Liquor and Drugs, Worth Over 5 Crore, Seized in Nashik, Illegal Liquor and Drugs Seized in Nashik, Start of Lok Sabha Poll Code of Conduct, nashik, nashik news, Illegal Liquor news,
आचारसंहितेत नाशिक जिल्ह्यात साडेपाच कोटीचा मद्यसाठा, अमली पदार्थ जप्त
raver lok sabha seat, Raksha Khadse increase in assets, Eknath Khadse s loan of 23 lakhs on Raksha Khadse, seven and a half crores, marathi news, lok sabha 2024, raver lok sabha 2024,
रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, महानगरपालिका, पोलीस, स्मार्ट सिटी कंपनी यांची संयुक्त बैठक झाली. मिरवणुकीत कर्कश आवाजाच्या ध्वनियंत्रणेचा वापर न करण्याचे ठरविण्यात आले. वाकडी बारव आणि नाशिकरोड या दोन्ही ठिकाणी मिरवणूक वेळेत सुरू होईल, याची मंडळांनी काळजी घ्यावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार मिरवणुकीस रात्री बारापर्यंतच परवानगी असून त्यावेळी मिरवणूक बंद होईल. कर्कश ध्वनियंत्रणेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यास बहुतांश मंडळांनी सहमती दर्शविली. तसेच अनेकांनी मिरवणुकीत गुलालही वापरला जाणार नसल्याचे म्हटले आहे. या वर्षी उत्सवात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. त्यामुळे मिरवणुकीवेळी महिला पोलिसांचा जादा बंदोबस्त ठेवण्याची मागणी मंडळांकडून झाली. त्या अनुषंगाने बंदोबस्त उपलब्ध केला जाणार आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. आपल्या भागात कोणी असे उपद्रवी असल्यास मंडळांनी त्यांची नावे यंत्रणेला द्यावीत. संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. मिरवणुकीसाठी वाहतुकीचे नियोजन प्रगतीपथावर असून लवकरच ते जाहीर केले जाणार आहे.

हेही वाचा >>> नाशिक: सिटीलिंकचा प्रवास आजपासून महाग ; मध्यरात्रीपासून नवीन भाडेवाढ लागू

शिवजयंती उत्सवात वापरल्या जाणाऱ्या फलकांबाबत प्रत्येक मंडळास पूर्वपरवानगी आवश्यक आहे. फलकाचा आकार, त्यावरील मजकूर आणि त्यावर वापरली जाणारी छायाचित्रे आदींची छाननी करून यंत्रणा परवानगी देणार आहे. फलकावरील मजकूर तपासून मनपा आणि पोलीस परवानगी देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवून मार्ग मोकळा केला जाईल. तसेच स्मार्ट सिटीला या मार्गावरील कामे लवकर पूर्ण करण्याची सूचना करण्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जुन्या नाशिकमधील काही मंडळे आपल्या भागातून पालखी काढण्याबाबत आग्रही आहेत. मिरवणूक मार्गावरून पालखी काढावी, असे पोलिसांनी त्यांना सुचवले आहे. या संदर्भात त्या मंडळांची स्वतंत्र बैठक बोलाविली जाणार असल्याचे सांगितले जाते. बैठकीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, मनपाच्या उपायुक्त अर्चना तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात आदी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीसाठी मंडळास पुरस्कार शिवजयंती उत्सवात सामाजिक बांधिलकी व सामंजस्याची भावना जोपासून आदर्श निर्माण करणाऱ्या एका सार्वजनिक मंडळास शहर पोलीस आणि महानगरपालिका यांच्यातर्फे पुरस्कार दिला जाणार असल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. शिवजयंती उत्सवात मंडळे रक्तदान, गरजुंना मदत आदी उपक्रम राबवू शकतात. सार्वजनिक मंडळांनी कर्कश ध्वनियंत्रणेचा वापर न करण्याचा स्त्युत्य निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.