नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो झाला. यादरम्यान, काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. परंतु, ठाकरे गटाकडून असे काही झालेच नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो झाला. या फेरीत दुचाकीस्वारांची संख्या मोठी होती. जुना गंगापूर नाका येथून फेरीस सुरुवात झाली. ही फेरी रावसाहेब थोरात सभागृहाजवळ आली असता महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी उमेदवार वाजे यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मशालीच्या प्रतिकृती दाखविण्यात आल्या. दरम्यान, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी, संबंधित प्रकाराविषयी आपणास कोणतीच माहिती नसल्याचा दावा केला.

हेही वाचा – नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या २४ मेपासून परीक्षा

हेही वाचा – व्यापारी मार्ग उभारणीनंतर कृषिमाल पुरविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी

मुख्यमंत्री शिंदे हे गुरुवारी रोड शोसाठी नाशिक येथे आले असता त्यांच्याबरोबर असलेल्या बॅगांची पोलीस तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. बॅगांमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. शिंदे हे मागील दौऱ्यात नाशिक येथे आले असता हेलिकाॅप्टरमधून उतरविण्यात आलेल्या बॅगांमधून पैसे आणण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik thackeray group sloganeering during cm eknath shinde road show ssb